Abdul Majeed: 54 मुले आणि सहा बायका असलेल्या ट्रक चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, जाणून घ्या परिवारातील लोकसंख्या
ट्रक चालकाचं अनोखं अर्धशतक, 54 मुले आणि सहा बायका, जाणून अधिक माहिती
मुंबई : अनेकदा आपल्याला देशातील एखादी अजब घटना समजल्यानंतर धक्का बसतो. परंतु अशा असंख्य घटना आपल्याला आता पटकन विविध माध्यमांमधून पाहता येतात. त्या ट्रक चालकाचा (Truck Driver)हृदयविकारामुळे निधन झाले. त्यानंतर त्यांची फॅमिली (Big Family) अधिक चर्चेत आली आहे. त्यांनी सहा लग्न केली, त्यामुळे त्यांच्या सहा पत्नी होत्या. त्याचबरोबर त्यांना एकूण 54 मुलं (54 children) झाली. त्यामुळे कुटुंबाचा मोठा विस्तार झाला.
आपण ज्या व्यक्तीची चर्चा करीत आहोत, ती व्यक्ती आपल्या देशातील नसून ती व्यक्ती अफगानिस्तानमधील बलिचिस्तानमधील नोशकी जिल्ह्यातील कली मैंगल गावची रहिवासी होती. त्याचं अब्दुल मजीद मेंगल असं आहे. त्यांचा मृत्यू झाल्यापासून त्यांची सगळीकडे अधिक चर्चा आहे.
मेंगल यांच्या कुटुंबियामध्ये सध्या 42 मुलं आहेत, तर त्यांच्या चार पत्नी आहेत. त्यांच्या दोन पत्नीचं निधन झालं आहे, तर 12 मुलांचा सुद्धा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या घरात सध्या 22 मुलं आहेत आणि 20 मुली आहेत. त्यांच्या नातवांना पकडून त्यांच्या कुटुंबाची एकूण लोकसंख्या 150 आहे. मैंगल यांनी वयाच्या अठराव्या वर्षाी लग्न केलं होतं.
2017 मध्ये ज्यावेळी अब्दुल मजीद मेंगल यांच्या कुटुंबियांची पाकिस्तानकडून जणगणना झाली होती. त्यावेळी अधिकाऱ्यांना घाम फुटला होता. हाजीचे गाव क्वेट्टापासून 130 किमी अंतरावर अफगाणिस्तानच्या सीमेजवळ आहे.