या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आता मिळणार दोन वर्षांची अतिरिक्त रजा

7th Pay Commission Latest News : सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कर्मचाऱ्यांना आता तब्बल दोन वर्षाची अतिरिक्त रजा मिळणार आहे. विशेष म्हणजे दोन मुलांची काळजी घेण्यासाठी ही रजा मंजूर करण्यात येणार आहे.

या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आता मिळणार दोन वर्षांची अतिरिक्त रजा
7th Pay Commission Latest NewsImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 22, 2023 | 1:08 PM

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून (7th Pay Commission) ऑल इंडिया सर्विस (AIS) च्या सगळ्या सदस्यांना सुट्टीच्या अनुशंगाने नियम आणि संशोधन करण्यात आलं आहे. त्यावर विचारविनिमय करुन झाल्यानंतर ऑल इंडिया सर्विसमधील (7th Pay Commission Latest News In marathi) सगळ्या सदस्यांना त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये दोन वर्षाची फुल्ल पगारी सुट्टी मिळू शकते. ही सुट्टी सरकारकडून दोन मोठ्या मुलांच्या देखभालीसाठी देण्यात येणार आहे.

कामगार विभागाकडून एक नोटीस नुकतीचं जाहीर करण्यात आली आहे. ही नोटीस २८ जुलै जाहीर करण्यात आली होती. या अंतर्गत केंद्र सरकारने राज्य सरकारांशी सल्लामसलत करून अखिल भारतीय सेवा मुलांची रजा नियम 1995 मध्ये सुधारणा केली आहे. एआईएस आणि कर्मचाऱ्यांना सुट्टीच्या काळात सातव्या वेतन आयोगानुसार पगार देण्यात येणार आहे.

७३० दिवसांची सुट्टी मिळणार

अखिल भारतीय सेवा महिला किंवा पुरुष कर्मचाऱ्याला दोन मोठ्या मुलांची काळजी घेण्यासाठी संपूर्ण सेवेत ७३० दिवसांची सुट्टी देण्यात येणार आहे. ही सुट्टी मुलांचं वय १८ वर्षे पुर्ण व्हायच्या आगोदर मिळणार आहे. त्यासाठी मुलाचं शिक्षण, आजार आणि त्याचं संगोपण यासाठी देण्याची तरतूद आहे.

हे सुद्धा वाचा

सुट्टीच्या दिवशी किती मिळणार पगार

चाइल्ड केअर लीव्ह अंतर्गत, कर्मचाऱ्याला पहिल्या एक वर्षासाठी पुर्ण पगार देण्यात येईल, तर दुसऱ्या वर्षी कर्मचाऱ्याला ८० टक्के पगार देण्यात येणार आहे.

कॅलेंडरमध्ये तीन सुट्ट्या

सरकारकडून एक वर्षात तीनपेक्षा अधिक सुट्ट्या दिल्या जात नाहीत. तर एकट्या महिलेला कॅलेंडर वर्षात 6 वेळा रजा मंजूर करण्यात येते. जाहीर झालेल्या माहितीनुसार, चाइल्ड केअर लीव्ह अंतर्गत,इतर सुट्ट्या त्याला जोडल्या जावू शकत नाहीत. त्याच खातं वेगळं असेल, ती कर्मचाऱ्यांना वेगळी सुट्टी दिली जाईल.

मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख.
जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?
जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?.
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.