8 लाखांची कार, 1.15 कोटींचे सोने, वायनाड लोकसभेसाठी उमेदवारी, प्रियंका गांधी यांच्याकडे एकूण संपत्ती तरी किती?

Congress Leader Priyanka Gandhi Networth : काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी बुधवारी 23 ऑक्टोबर रोजी वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज भरला. राहुल गांधी यांनी हा मतदारसंघ सोडल्यानंतर निवडणूक आयोगाने या ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर केली आहे.

8 लाखांची कार, 1.15 कोटींचे सोने, वायनाड लोकसभेसाठी उमेदवारी, प्रियंका गांधी यांच्याकडे एकूण संपत्ती तरी किती?
प्रियंका गांधी यांची संपत्ती इतकी
Follow us
| Updated on: Oct 24, 2024 | 10:13 AM

काँग्रेस नेता प्रियंका गांधी यांनी बुधवारी 23 ऑक्टोबर रोजी वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी नामांकन अर्ज भरला. यावेळी त्यांच्यासोबत आई सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे उपस्थित होते.राहुल गांधी यांनी हा मतदारसंघ सोडल्यानंतर निवडणूक आयोगाने या ठिकाणी पोट निवडणूक जाहीर केली आहे. नामनिर्देशन अर्जात त्यांनी संपत्ती जाहीर केली आहे. त्यानुसार, त्यांच्याकडे 8 लाखांची कार आणि 1.15 कोटी रुपयांचे सोने आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्यापूर्वी प्रियंका गांधी या वायनाड येथील कलपेट्टामधील रोड शोमध्ये सहभागी झाल्या.

प्रियंका गांधी यांच्याकडे संपत्ती किती?

प्रियंका गांधी यांच्या शपथपत्रानुसार, त्यांच्याकडे 4 कोटी 24 लाखांची जंगम मालमत्ता आहे. त्यात 52 हजारांची रोख रक्कम, 2 कोटी 24 लाखांचे म्युच्युअल फंड, तर बँक खात्यात जवळपास 3 लाख 60 हजार रुपये, पीपीएफ खात्यात 17 लाख 38 हजार रुपये, एक होंडा सीआरव्ही कार, जिची किंमत 8 लाख रुपये आहे. ही कार त्यांना पतीने भेट दिली आहे. तर याशिवाय त्यांच्याकडे 1 कोटी 15 लाखांचे सोने आणि 29 लाखांची चांदी आहे.

हे सुद्धा वाचा

प्रियंका गांधी यांच्याकडे 2 कोटी 10 लाख 13 हजार 598 रुपयांची जमीन आहे. दिल्लीजवळील सुलतानपूर महरोली या गावात ही जमीन आहे. त्यामध्ये त्यांचा भाऊ राहुल गांधी यांचा पण वाटा आहे. प्रियंका गांधी यांच्याकडे हिमाचल प्रदेशातील शिमला येथे 5 कोटी 63 लाख 99 हजार रुपयांचे एक घर आहे.

कोणत्या खात्यात किती पैसे?

प्रियंका गांधी यांनी त्यांच्या संपत्तीची विस्तृत माहिती दिली आहे. त्यानुसार, एचडीएफसी बँकेच्या दिल्ली शाखेत त्यांच्याकडे 2 लाख 80 हजार 953 रुपये, यूको बँक, दिल्‍ली शाकेत 80 हजार 399 रुपये आणि कॅनरा बँकेच्या केरळमधील शाखेत 5 हजार 929 रुपये जमा आहेत. त्यांची स्थावर मालमत्ता 7 कोटी 74 लाख 12 हजार 598 रुपये इतकी आहे. याशिवाय प्रियंका गांधी यांनी निवडणूक शपथपत्रात केलेल्या दाव्यानुसार, त्यांच्याविरोधात तीन खटले सुरू आहेत. त्यामध्ये कलम 420, 469, 188, 269, 270, 9 आणि 51 अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहे. त्यातील दोन प्रकरणं ही उत्तर प्रदेशातील तर एक मध्य प्रदेशातील आहे.

मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.