बनावट दारू प्यायल्याने 8 जणांचा मृत्यू, 25 जण रुग्णालयात दाखल
विषारी दारु प्यायल्याने आठ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २५ जण रुग्णालयात असल्याची माहिती सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या काही जणांची प्रकृती अधिक गंभीर आहे.
नवी दिल्ली : बिहार (Bihar) राज्यात एक मोठी घटना घडली आहे. त्यामुळे त्याचे पडसाद सगळीकडे उमटताना दिसत आहेत. राज्यात बनावट दारु विक्री (Sale of fake liquor) करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. आतापर्यंत देशात (India) अशा अनेक घटना घडल्या आहेत. बनावट दारू प्यायल्याने तडफडून 8 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. २५ जण अजून उपचार घेत आहे. त्यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. मोतिहारी, लक्ष्मीपुर पहाड़पुर, हरसिद्धि या परिसरातील लोकांचा मृत्यू झाला आहे. याच्या आगोदर सुध्दा बिहार राज्यात अशा पद्धतीच्या अनेक घटना घडल्या आहेत.
प्रशासनाला दोषी ठरवण्यात आलं
विषारी दारुमुळे नागरिकांचा मृत्यू झाल्यामुळे तिथल्या भाजपच्या कार्यकर्त्यानी मुख्यमंत्री नितेश कुमार यांच्या टीका करायला सुरुवात केली आहे. गेल्यावर्षी सुध्दा सारण जिल्ह्यात विषारी दारु प्यायल्याने ४० जणांचा मृ्त्यू झाला होता. त्यावेळी सुध्दा सत्तेत असलेल्या सरकारवरती जोरदार टिका झाली होती. सारण जिल्ह्यात ज्यावेळी विषारी दारुचा कांड झाला होता. त्यावेळी प्रशासनाला दोषी ठरवण्यात आलं होतं.
दारु प्यायल्याने अनेकांचा मृत्यू झाला
देशात अनेकदा दारु प्यायल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यावर तात्पुरती कारवाई केली जाते, त्यानंतर पुन्हा परिस्थिती सारखी होत असल्याची पाहायला मिळत आहे. काही राज्यात या कारणामुळे दारु काढण्यास बंदी घातली आहे. त्याचबरोबर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. इतक्या घटना घडल्यानंतर तिथलं सरकार किंवा मुख्यमंत्री नितीश कुमार काय निर्णय घेणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.