Nitin Gadkari: जुन्या ९ लाख गाड्या १ एप्रिल रोजी भंगारात काढणार, पाहा कोणती वाहनं भंगारात
येत्या एक एप्रिलपासून पंधरा वर्षे जुनी झालेली रस्त्यावरील प्रदुषात भर घालणारी सर्व वाहने भंगारात काढली जाणार आहेत. अशा स्क्रॅपमध्ये काढल्या जाणाऱ्या वाहनांची संख्याच सुमारे नऊ लाख आहे.
दिल्ली : येत्या एक एप्रिलपासून प्रदुषणात भर घालणारी आणि जुनी झाल्याने अधिक इंधन ( fuel ) पिणारी देशभरातील तब्बल नऊ लाख वाहने भंगारात जमा होणार आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी ( nitingadkari ) यांनी फिक्की या उद्योजकांच्या एका कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली आहे. देशभरातील सर्व राज्यांना यासंदर्भात जुन्या सरकारी वाहनांना मोडीत काढून नवीन पर्यायी इंधनावरील वाहने खरेदी करण्याची मूभा देण्यात आली असल्याचेही नितीन गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
येत्या एक एप्रिलपासून पंधरा वर्षांहून जुनी झालेली रस्त्यांवरील सर्व सरकारी वाहने मोडीत निघणार आहेत. केंद्र सरकारने पंधरा वर्षांहून जुन्या असलेल्या वाहनांना सेवेतून काढण्यासाठी नुकतेच आपले स्क्रॅप पॉलीसी जाहीर केली आहे. याची सुरूवात सुरूवातीला सरकारी खात्यातील जुन्या वाहनांना मोडीत काढण्यापासून होणार आहे. त्यानूसार केंद्र सरकार सह राज्यातील सरकारी उपक्रमातील वाहनांना आधी मोडीत काढण्यात येणार आहे. कालच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पीय भाषणातही सरकारच्या जुन्या वाहनांना नष्ट करण्याच्या धोरणाचा उल्लेख करीत देशातील सर्व राज्य सरकारांना यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते.
नवीन वाहने खरेदी करण्याची परवानगी
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी फिक्की या उद्योजकांच्या एका कार्यक्रमात बोलताना सांगितले की, ‘केंद्र सरकार इथेनॉल, मिथेनॉल, बायो-सीएनजी, बायो-डीझेल, बायो-एलएनजी आणि इलेक्ट्रीक वाहनांचा वापर वाढविणार असून या वाहनांना अधिक सुविधाजनक बनविण्यासाठी आम्ही पावले उचलत आहोत.’
नवीन वाहने खरेदी करण्याची परवानगी
पंधरा वर्षे जुनी झालेली सरकारी विभागातील सर्व वाहने भंगारात जाणार आहेत. अशा स्क्रॅपमध्ये काढलेल्या वाहनांची संख्याच सुमारे नऊ लाखाहून अधिक असून त्यांचा लिलाव करण्याची आम्ही परवानगी दिली आहे. त्याच बरोबर प्रदुषण करणाऱ्या परीवहन सेवेतील बसेस आणि कारचा रस्त्यावरील वापर बंद करून नवीन वाहने घेण्याच्या प्रस्तावाला आम्ही परवानगी दिली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषणाला आळा बसेल असेही ते म्हणाले. यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अलिकडेच अध्यादेश जारी केला आहे