94 कोटी कॅश, आठ कोटीचे हीरे, 30 लक्झरी घड्याळे, इन्कम टॅक्सच्या धाडीत घबाड सापडलं

आयकर विभागाने आज कर्नाटक, तेलंगणा, आंध्र आणि दिल्लीत अशा राज्यात 55 ठिकाणी छापा टाकून व्यावसायिकांकडून 94 कोटी रुपये जप्त केले आहे. कॉंग्रेस आणि भाजपात यावरुन कलगीतुरा लागला आहे.

94 कोटी कॅश, आठ कोटीचे हीरे, 30 लक्झरी घड्याळे, इन्कम टॅक्सच्या धाडीत घबाड सापडलं
it raidImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Oct 16, 2023 | 10:18 PM

नवी दिल्ली | 16 ऑक्टोबर 2023 : आयकर विभागानाने कर्नाटक, तेलंगणा, दिल्ली आणि आंध्रप्रदेशात 55 ठिकाणी अचानक धाडी टाकून कंत्राटदार आणि रिअल इस्टेट ईस्टेट डेव्हलपर यांच्या घर आणि कार्यालयातून सुमारे 94 रुपयांची रोकड जप्त केली आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेशन अर्थात सीबीडीटी सांगितले की या कारवाईत 94 कोटीची रोकड, 8 कोटीचे सोने आणि हिऱ्यांचे दागिने आणि 30 महागडी घड्याळं जप्त केली आहेत.

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने म्हटले आहे की झडतीमध्ये सुमारे 94 कोटीची कॅश आणि आठ कोटीहून अधिक किंमतीचे सोने आणि हिऱ्यांचे दागिने जप्त करण्यात आले. एकूण मिळून 102 कोटी रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आरोपींची ओळख जाहीर न करता सीबीडीटीने सांगितले की याशिवाय एका खाजगी कर्मचाऱ्याकडून 30 लक्झरी घड्याळांचे कलेक्शन जप्त करण्यात आले आहे.

भाजपा आणि कॉंग्रेस मध्ये घमासान

कर्नाटकातील याधाडीनंतर सत्ताधारी कॉंग्रेस आणि भाजपात जोरदार खडाजंगी उडाली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कतील यांनी हा पैसा कॉंग्रेसशी संबंधित आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हा आरोप फेटाळत त्यास निराधार म्हटले आहे.सीबीडीटी आयकर विभागासाठी धोरण ठरवित असतो. त्यांनी ही कारवाई केली आहे.

अशी हेराफेरी केली

आयकर विभागाच्या या धाडीत कागदपत्रांच्या हार्डकॉपी आणि डीजिटल डेटाही मिळाला आहे. या वरुन स्पष्ट होतेय की आरोपी केवळ कर चोरीच केली नाही तर खोट्या खरेदीद्वारे आपला खर्च वाढवून आपले उत्पन्न कमी दाखविले. छापेमारीत अनेक मालाच्या पावत्यांमध्ये विसंगती आढळली. हे ठेकदार गैरव्यावसायिक उद्देश्यासाठी बुकींक खर्चातही सामील होते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.