भारतातील पहिली एसी ट्रेन कोणती माहीती आहे का ? एसीसाठी अशी करावी लागायची कसरत

त्याकाळी लांबपल्ल्याच्या ट्रेन कोळशाच्या इंजिनावर ट्रेन धावत असायच्या त्यामुळे या ट्रेनला एसी कसा असायचा माहीती करुन घेणे इंटरेस्टींग आहे.

भारतातील पहिली एसी ट्रेन कोणती माहीती आहे का ? एसीसाठी अशी करावी लागायची कसरत
first ac train in british indiaImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jul 20, 2023 | 4:01 PM

मुंबई | 19 जुलै 2023 : आता आपण एसी लोकलमधून ( Ac Local ) किंवा मेल-एक्सप्रेसच्या ( Mail Express ) एसी श्रेणीच्या डब्यातून आरामात प्रवास करीत असतो. आताच्या एसी अत्यंत आधुनिक आहेत. या एसी डब्यातून ( AC comfort ) प्रवास करताना आपल्याला उन्हाळ्याच्या उकाड्याचा, धुळीचा त्रास किंवा बाह्य वातावरणाचा कसलाच त्रास होत नाही. परंतू तुम्हाला भारताची पहिली एसी ट्रेन माहीती आहे का ? या ट्रेनची धाव थेट पाकिस्तानातील पेशावरपर्यंत होती. कोणती ही ट्रेन पाहूयात…

भारताची पहिली एसी ट्रेन 1 सप्टेंबर 1928 रोजी पार पारतंत्र्यात सुरु झाली होती. या ट्रेनला साल 1934 मध्ये प्रथम एसीचे डबे लावण्यात आले. त्याकाळी लांबपल्ल्याच्या ट्रेन कोळशाच्या इंजिनावर ट्रेन धावत असायच्या त्यामुळे या ट्रेनला एसी कसा असायचा माहीती करुन घेणे इंटरेस्टींग आहे. या ट्रेनला फर्स्ट आणि सेंकड क्लास असा दर्जा होता. ब्रिटीशांना केवळ फर्स्टक्लासने प्रवास करण्याची मूभा असायची.

मुंबईच्या बेलार्ड पिअर येथील स्थानकातून ( बोरीबंदर स्थानक बांधण्यापूर्वीचे स्थानक ) 1 सप्टेंबर 1928 रोजी ही ट्रेन सुरु झाली. या ट्रेनला दिल्ली, भटींडा, फिरोजपूर आणि लाहोर ते पेशावर अशी स्थानके होती. या ट्रेनचा प्रवास फ्रंटपर्यंत होत असल्याने कदाचित तिला फ्रंटीयर एक्सप्रेस असे नाव दिले असावे. नंतर या ट्रेनला एसी दर्जाची सुविधा दिली. स्वातंत्र्यानंतर तिचा प्रवास पंजाबपर्यंत होऊ लागल्याने तिला पंजाब मेल असे संबोधण्यात येऊ लागले. ही त्याकाळातील लक्झरीय ट्रेन म्हटली जायची. वाफेच्या इंजिनावर ती 60 किमी वेगाने धावायची. ही ट्रेन दिल्ली ते चेन्नई धावणाऱ्या ‘ग्रँड ट्रंक एक्सप्रेस’ ( 1 जानेवारी 1929 ) पेक्षाही जुनी आहे.

तेव्हा 46 तास व 2542 कि.मी.अंतर

ही ट्रेन तेव्हा 46 तासांमध्ये तब्बल 2542 कि.मी.चे अंतर कापायची ! 1914 पासून ती बेलार्ड पिअरऐवजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून ( व्हीक्टोरीया टर्मिनस) सुटू लागली. सन 1947 पर्यंत पंजाब मेल सकाळी 9.30 वाजता पेशावरहून निघायची आणि लाहोरला सायं.7.45 वा. पोहोचायची तर रात्री 9.35 वा. फिरोजपूरला पोहचत तिचा प्रवास तिसर्‍या दिवशी सकाळी 7.39 वा. बोरीबंदरच्या व्हीक्टोरीया टर्मिनसला संपायचा.

एसीसाठी काय करावे लागायचे

या ट्रेनमध्ये फर्स्ट क्लासच्या प्रवाशांना वातानुकूलित डब्यात थंडगार वाटण्यासाठी ही ट्रेन सुटण्यापूर्वी तिच्या डब्याच्या खाली अक्षरश: बर्फाच्या लाद्या घातल्या जायच्या. त्यामुळे प्रवाशांना थंडगार वाटायचे. हे बर्फ वितळले की पुन्हा पुढच्या स्थानकावर बर्फाच्या लाद्या टाकायच्या. बिचाऱ्या कर्मचाऱ्यांना साहेबांना थंडगार ठेवण्यासाठी हा उपदव्याप करावा लागायचा. आता ही ट्रेन मध्य रेल्वेवरुन वीजेवर धावते. आता पंजाब मेलला (क्र.12137/12138 ) एलएचबीचे आधुनिक डब्बे लावले आहेत.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.