कंगाल पाकिस्तानसाठी सौदी अरेबियाच्या क्राउन प्रिन्सकडून मोठी घोषणा, काय होणार परिणाम?

| Updated on: Jan 11, 2023 | 8:30 PM

गेल्या वर्षी सौदी अरेबियानं पाकिस्तानला दिली जाणारी आर्थिक मदत दुप्पट केली होती. याशिवाय ४.२ अऱब डॉलर परत करण्याची तारीख वाढविण्यात आली होती.

कंगाल पाकिस्तानसाठी सौदी अरेबियाच्या क्राउन प्रिन्सकडून मोठी घोषणा, काय होणार परिणाम?
क्राऊन प्रिंस मोहम्मद बिन सलमान
Follow us on

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या (Pakistan) नवीन वर्षाची सुरुवात अतिशय बेकार झाली.  पाकिस्तान कंगाल झाला आहे. पाकिस्तानमध्ये महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सौदी अरेबिया पाकिस्तानला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानचे आर्मी प्रमुख जनरल सय्यद आसिम मुनीर सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) दौऱ्यावर आहेत. गेल्या आठवड्यात ते सौदी अरेबियाला गेले. सोमवारी त्यांची भेट सौदी अरेबियाच्या क्राऊन प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांच्याशी झाली. या भेटीनंतर सौदी क्राऊन प्रिंसने पाकिस्तानात १० अरब डॉलर गुंतवणूक करता येईल का, यावर अभ्यास करण्याचे निर्देश दिले. याशिवाय पाच अऱब डॉलरने पाकिस्तानच्या केंद्रीय बँकेतील डिपॉझिट वाढवता येईल का, यावरही एसडीएफला विचारना केली.

क्राऊन प्रिंसने इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मदत करण्याचे निर्देश दिले. क्रॉउन प्रिंस मोहम्मद बिन सलमान आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या चर्चेनंतर हा निर्णय़ घेण्यात आला.

गेल्या वर्षी सौदी अरेबियानं पाकिस्तानला दिली जाणारी आर्थिक मदत दुप्पट केली होती. याशिवाय ४.२ अऱब डॉलर परत करण्याची तारीख वाढविण्यात आली होती. शिवाय डिसेंबर २०२१ मध्ये पाकिस्तान स्टेट बँकेत ३ अरब डॉलर जमा केले होते.

 

सौदी अरेबिया पाकिस्तानला मदत का करतो?

सुन्नी बहुल देश सौदी अरेबिया आणि शिया बहुल देश इरान यांच्यात वर्चस्वावरून वाद आहे. इरान आणि सौदी अरेबिया यांच्यात शत्रृत्व आहे. इरान आणि सौदी अरेबिया यांच्यात शित युद्धही सुरू आहे. गरज पडल्यास पाकिस्तान सैन्याची मदत सौदी अरेबियाला करू शकते. मुस्लीम देशांपैकी पाकिस्तानात परमाणू शक्ती आहे. गरज पडल्यास परमाणू शक्ती सौदी अरेबियाला देऊ शकते.

 

ऑक्टोबर २०१९ मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान इमरान खान यांनी सौदी अरेबिया दौऱ्यात सुरक्षेसाठी सौदी अरेबियासोबत असल्याचं म्हटलं होतं. पाकिस्तान सौदी अरेबियाच्या सैन्यांनाही प्रशिक्षण देते. सौदी अरेबियामध्ये पाकिस्तानचे सुमारे ६५ हजार सैनिक असल्याची माहिती आहे.

 

सौदी अरेबियाची रणनीती

 

१९७० च्या दशकात तेलाच्या किमती वाढल्या. तेव्हा सौदी अरेबियामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा आला. सौदी अरबने फक्त पैशानेच नव्हे तर धार्मिक मदतही केली. सौदी अरेबियाने पाकिस्तानातील मशिदी आणि मदरशांना मदत केली.

 

सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिंस मोहम्मद बीन सलमान फेब्रुवारी २०१९ ला पाकिस्तान दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी २० अरब डॉलरच्या गुंतवणुकीची घोषणा केली होती. शिवाय सौदी अरेबियाच्या जेलमध्ये असलेल्या दोन हजार कैद्यांच्या सुटकेची घोषणा केली होती.