अमित शाह यांच्या फेक व्हिडिओचे सापडले धागेदोरे; जिग्नेश मेवाणीचा पीए आणि AAP नेत्याला अटक
Amit Shah Fake Video : गुजरातमधून एक मोठी अपडेट समोर येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात काँग्रेसचे आमदार जिग्नेश मेवाणी यांचा स्वीय सहायक आणि एका आप कार्यकर्त्याला पोलिसांनी अटक केली आहे. गृहमंत्र्यांचे एडिटेड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा प्रकार नुकताच समोर आला होता.
केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे मोठे नेते अमित शाह यांचा फेक व्हिडिओ व्हायरल झाला होता. याप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी फेक व्हिडिओप्रकरणात काँग्रसचे आमदार जिग्नेश मेवाणी यांचा पीए सतीश वर्सोला याला अटक केली आहे. गुजरातमधील पालनपुर येथून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तर आर बी बारिया याला लिमखेडा येथून अटक करण्यात आली. तो आम आदमी पक्षाचा दाहोद जिल्हाध्यक्ष असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हा व्हिडिओ एका राजकीय ग्रुपमध्ये व्हायरल केल्याचे तपासाता समोर आले आहे.
सतीश असं करणार नाही
काँग्रेसचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी या सर्व घटनाक्रमावर प्रतिक्रिया दिली आहे. ” मी माझ्या जीवनात फेक व्हिडिओ, वा त्याचा समर्थक असू शकत नाही. मी अशा सर्व गोष्टींची निषेध करतो. निवडणूक काळात कोणाला असे लक्ष्य करणे योग्य नाही. सतीश मला भावा सारखा आहे. मला त्याचा मित्र असल्याचा अभिमान आहे. पण तो अशी व्यक्ती नाही, जो नाहक, वाईट विचाराने काही करील. मी 6 वर्षांपासून त्याला अत्यंत जवळून जाणतो.”
तेलंगाणाच्या मुख्यमंत्र्यांना बोलवले
तर दिल्ली पोलिसांनी प्रकरणात तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना पण बोलावणे धाडले आहे. मुख्यमंत्र्यांना 1 मे रोजी दिल्ली पोलिसांच्या सायबर युनिटसमोर त्यांच्या वैयक्तिक मोबाईलसह हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. पुढील तपासासाठी त्यांचे इलेक्ट्रिक उपकरण जमा करण्यास त्यांना सांगण्यात आले आहे. तर याच प्रकरणात आसाम पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्याकडील दोन मोबाईल आणि एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. या व्यक्तीचे नाव रीतॉम सिंह असे आहे.
#WATCH | Ahmedabad: Gujarat Police have arrested two people, including Congress MLA Jignesh Mevani’s PA Satish and an AAP worker, for allegedly sharing an edited video of Union Home Minister Amit Shah
Lavina Sinha, DCP, Zone-1, Ahmedabad says, “Edited video of Union Home… pic.twitter.com/vmjjyQ8oYn
— ANI (@ANI) April 30, 2024
भाजपने केली निवडणूक आयोगाकडे तक्रार
- भाजपने काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. निवडणूक प्रक्रियेला हरताळ फासण्यासाठीच काँग्रेसने अमित शाह यांचा एक फेक व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजपने काँग्रेसविरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे.
- प्रकरणात मुंबई पोलिसांनी पण काही जणांविरोधात कारवाई केली आहे. पोलिसांनी महाराष्ट्र युवा काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडल आणि इतर 16 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स सायबर पोलीस ठाण्यात मुंबई भाजपचे पदाधिकारी प्रतिक कारपे यांनी तक्रार दिली होती.
- भाजपनुसार, यातील मूळ व्हिडिओ फुटेज तेलंगाणा राज्यातील 2023 मधील भाषणातील भाग आहे. त्यावेळी गृहमंत्र्यांनी राज्यातील मुसलमानांसाठी लागू 4 टक्के आरक्षण “असंवैधानिक” असल्याचे म्हटले होते. हा व्हिडिओ एडिट करुन सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. त्यामध्ये एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षण संपविण्याचा ते आश्वासन देत असल्याचे दाखविण्यात आले आहे. या फेक व्हिडिओविरोधात पोलिसांकडे तक्रार देण्यात आलेली आहे.