बंगळुरू विमानतळावर बॉम्ब असल्याचा फोन, धमकीचा फोन आल्याने माजली खळबळ

खबरदारीचा उपाय म्हणून सीआयएसएफ जवानांकडून कडून संपूर्ण विमानतळाची कसून तपासणी सुरू आहे. बॉम्ब असल्याची निव्वळ अफवा असल्याचे सीआयएसएफकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. कॉल करणाऱ्याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.

बंगळुरू विमानतळावर बॉम्ब असल्याचा फोन, धमकीचा फोन आल्याने माजली खळबळ
धमकीचा फोन आल्याने माजली खळबळ Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 20, 2022 | 10:25 AM

बंगळुरू – बंगळुरू विमानतळावर (Airport Bengaluru) बॉम्ब (Bomb) असल्याचा आणि धमकीचा फोन आल्याने खळबळ माजली आहे. विमानतळावर बॉम्ब असल्याच्या अफवेने गोंधळ माजला होता. खबरदारीचा उपाय म्हणून सीआयएसएफ (CRPF) जवानांकडून कडून संपूर्ण विमानतळाची कसून तपासणी सुरू आहे. बॉम्ब असल्याची निव्वळ अफवा असल्याचे सीआयएसएफकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. कॉल करणाऱ्याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.

बॉम्ब निकामी पथकही घटनास्थळी हजर

बेंगळुरू येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी सकाळी बॉम्ब असल्याचा फोन आला. त्यानंतर धमकी देण्यात आली, त्यानंतर सुरक्षा दल आणि स्थानिक पोलिसांनी कारवाई केली. श्वानपथक आणि स्थानिक पोलिसांसह सीआयएसएफच्या पथकांनी विमानतळावर झडती घेतली. बॉम्ब निकामी पथकही घटनास्थळी हजर होते. पोलिस अद्यापही विमानतळावर चौकशी करीत आहेत. तसेच ज्या अज्ञात इसमाने फोन केला होता, त्याचा शोध देखील घेत आहेत.

हे सुद्धा वाचा

अधिकाऱ्यांनी दिली माहिती

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी एका अज्ञात व्यक्तीने विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा फोन केला होता. त्यानंतर तिथल्या यंत्रणांमध्ये खळबळ माजली. तसेच प्रवाशांना महत्त्वाच्या सुचना देण्यात आल्या. सीआरपीएफ जवानांनी तात्काळ विमानतळाचा संपुर्ण परिसर पिंजून काढला. पण त्यांना त्यामध्ये काही सापडले नाही. श्वानपथक देखील तिथं हजर झालं होतं. पण कुणीतरी मुद्दाम फोन करून धमकी दिल्याचं प्रशासननाकडून जाहीर करण्यात आलं आहे. सध्या पोलिस आणि संबंधित यंत्रणा अज्ञात इसमाचा शोध घेत आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.