बंगळुरू – बंगळुरू विमानतळावर (Airport Bengaluru) बॉम्ब (Bomb) असल्याचा आणि धमकीचा फोन आल्याने खळबळ माजली आहे. विमानतळावर बॉम्ब असल्याच्या अफवेने गोंधळ माजला होता. खबरदारीचा उपाय म्हणून सीआयएसएफ (CRPF) जवानांकडून कडून संपूर्ण विमानतळाची कसून तपासणी सुरू आहे. बॉम्ब असल्याची निव्वळ अफवा असल्याचे सीआयएसएफकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. कॉल करणाऱ्याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.
बॉम्ब निकामी पथकही घटनास्थळी हजर
बेंगळुरू येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी सकाळी बॉम्ब असल्याचा फोन आला. त्यानंतर धमकी देण्यात आली,
त्यानंतर सुरक्षा दल आणि स्थानिक पोलिसांनी कारवाई केली. श्वानपथक आणि स्थानिक पोलिसांसह सीआयएसएफच्या पथकांनी विमानतळावर झडती घेतली. बॉम्ब निकामी पथकही घटनास्थळी हजर होते. पोलिस अद्यापही विमानतळावर चौकशी करीत आहेत. तसेच ज्या अज्ञात इसमाने फोन केला होता, त्याचा शोध देखील घेत आहेत.
अधिकाऱ्यांनी दिली माहिती
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी एका अज्ञात व्यक्तीने विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा फोन केला होता. त्यानंतर तिथल्या यंत्रणांमध्ये खळबळ माजली. तसेच प्रवाशांना महत्त्वाच्या सुचना देण्यात आल्या. सीआरपीएफ जवानांनी तात्काळ विमानतळाचा संपुर्ण परिसर पिंजून काढला. पण त्यांना त्यामध्ये काही सापडले नाही. श्वानपथक देखील तिथं हजर झालं होतं. पण कुणीतरी मुद्दाम फोन करून धमकी दिल्याचं प्रशासननाकडून जाहीर करण्यात आलं आहे. सध्या पोलिस आणि संबंधित यंत्रणा अज्ञात इसमाचा शोध घेत आहेत.