Jammu Encounter Video : हाडं गोठवणाऱ्या जम्मूतल्या एन्काऊंटरचं सीसीटीव्ही फुटेत आलं समोर, दहशतवाद्यांकडून अंधाधूंद गोळीबार
जम्मू-काश्मीर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जम्मू दौऱ्याच्या दोन दिवस आधी दहशतवादाचा मोठा कट उधळण्यात सीआयएसएफ (CISF) जवानांना यश आले आहे. जम्मूतील सुंजवान आणि चड्ढा आर्मी कॅम्पजवळ दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. यानंतर सुरू झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार झाले आहेत. तर या चकमकीत सीआयएसएफचे एएसआय एसपी पटेल शहीद झाले असून, 5 जवान जखमी झाले […]
जम्मू-काश्मीर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जम्मू दौऱ्याच्या दोन दिवस आधी दहशतवादाचा मोठा कट उधळण्यात सीआयएसएफ (CISF) जवानांना यश आले आहे. जम्मूतील सुंजवान आणि चड्ढा आर्मी कॅम्पजवळ दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. यानंतर सुरू झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार झाले आहेत. तर या चकमकीत सीआयएसएफचे एएसआय एसपी पटेल शहीद झाले असून, 5 जवान जखमी झाले आहेत. त्यानंतर या दहशतवादी हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV footage) शनिवारी सोशल मीडियावर व्हारल झाले. याच्या आधी जम्मू-काश्मीरमधील बारामुल्लामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात जोरदार चकमक झाली. त्यात सुरक्षा दलांनी पाकिस्तानच्या जैश-ए-मोहम्मद (JeM) च्या दोन दहशतवाद्यांना ठार मारले होतं. एएनआय या वृत्तसंस्थेने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये सीआयएसएफ जवानांना घेऊन जाणारी बस रस्त्याच्या मधोमध थांबलेली दिसते. बस थांबल्यानंतर काही वेळातच जवळच्या घरातून बसवर हल्ला करण्यात आला. गोळीबार सुरू असताना गोळीबाराचा आवाजही व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे.
2 दहशतवादी ठार
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांची माहिती मिळताच पहाटे ४.१५ वाजता सुरक्षा दल सुंजवान कॅम्पमध्ये पोहोचले होते. येथे दहशतवाद्यांशी चकमक सुरू झाली. यामध्ये 2 दहशतवादी ठार झाले असून एक अधिकारी शहीद झाला आहे. तर युसूफ दार उर्फ कांत्रू, हिलाल शेख उर्फ हंझाला आणि फैसल दार अशी ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. तिन्ही दहशतवादी लष्कर-ए-तैयबाचे आहेत. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
मोठ्या कटाचा भाग
त्याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या काही दिवस आधीच म्हणजेच शुक्रवार ही घटना समोर आली. त्यानंतर झालेल्या आत्मघातकी हल्ल्याला सुरक्षा दलांनी चोख उत्तर दिले. ज्यात 2 दहशतवादी ठार मारले गेले. तसेच जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान यांच्या दौऱ्याच्या आधी झालेला हा हल्ला मोठ्या कटाचा भाग असू शकतात.
नुकसान करण्याचा कट
त्यानंतर पोलिसांनी केलेल्या शोध मोहिमेदरम्यान एका घरातून दोन एके-47 रायफल, शस्त्रे आणि दारूगोळा, सॅटेलाइट फोन आणि काही कागदपत्रेही जप्त केली. तसेच जम्मू झोनचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजीपी) मुकेश सिंग यांनीही सांगितले की, दहशतवादी मोठ्या प्रमाणात नुकसान करण्याचा कट रचत होते. दहशतवाद्यांनी ज्याप्राकरचे आयईडी बनियान घातले होते.त्यावरून हेच स्पष्ट होते की, ते कोणतातरी मोठा कट रचत होते. परंतु गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा दलांच्या वेळीच कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला.
#WATCH CCTV footage of the terrorist attack on the bus carrying CISF personnel in the Sunjwan area of Jammu early yesterday
(Source unverified) pic.twitter.com/2TUzFIupZy
— ANI (@ANI) April 23, 2022