प्रेयसी हवी या मागणीसाठी तो पोहचला २ हजार किमी अंतरावरील मंदिरात, भगवानाच्या मूर्तीसमोर मागितल्या आणखी या मागण्या

| Updated on: May 06, 2023 | 5:22 PM

हा युवक प्रेयसीच्या मागणीसाठी दोन हजार किलोमीटर दूर मंदिरात पोहचला. भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीसमोर त्याने आपली इच्छा व्यक्त केली.

प्रेयसी हवी या मागणीसाठी तो पोहचला २ हजार किमी अंतरावरील मंदिरात, भगवानाच्या मूर्तीसमोर मागितल्या आणखी या मागण्या
Follow us on

नवी दिल्ली : भगवान गौतम बुद्ध यांच्या ७१ मीटर लांब प्रतिमेसमोर उभा होऊन झांगने मागणी केली. झांगने मूर्तीच्या कानाजवळ एक मोठा एअरपॉडच्या आकाराचा स्पीकर ठेवला. त्यात त्याने आपली इच्छा व्यक्त केली. स्पीकरमुळे माझा आवाज भगवान बुद्धांपर्यंत स्पष्ट ऐकू जाईल, अशी त्याला आशा आहे. चिनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ चर्चेचा विषय बनलाय. यात उंच गौतम बुद्धांच्या मूर्तीसमोर प्रार्थना करताना एक युवक दिसत आहे. त्याने प्रेयसीसह कार आणि करोडपती होण्याची इच्छा व्यक्त केली. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने हे वृत्त दिलंय.

जगातील सर्वात उंच मूर्ती

या व्हिडीओला झांग नावाच्या व्यक्तीने चिनी सोशल मीडियावर शेअर केले. तो दोन हजार किलोमीटरचा प्रवास करून चीनच्या झेजिगांग प्रांतातून सिचुआन प्रांतातील एका बौद्ध मंदिरात पोहचला. येथे जगातील सर्वांत उंच गौतम बुद्ध यांची मूर्ती आहे. ही मूर्ती शेकडो वर्षांपूर्वी तांग राजवंशादरम्यान बनवण्यात आली.

हे सुद्धा वाचा

तुम्हाला माहीत आहे का…

झांगने भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीसमोर जोराने आवाज दिला. विशाल बुद्ध, तुम्हाला माहीत आहे काय की मी २७ वर्षांचा आहे. माझ्याकडे कार, घर किंवा प्रेयसी नाही. मी श्रीमंत होऊ इच्छितो. मला १० मिलीयन युआन (सुमारे १२ कोटी रुपये) पाहिजे. मला एक प्रेयसी हवी. ती सुंदर हवी. तिने पैशावर नव्हे माझ्यावर प्रेम केले पाहिजे.

सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया

झांग यांचे म्हणणे असे आहे की, त्याला बुध वक्र असल्यामुळे त्याचे भाग्य उजाळले नाही. दोष दूर करण्यासाठी तो प्रार्थना करण्यासाठी आला. झांगशी संबंधित चिनी सोशल मीडियात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. हा युवक प्रेयसीच्या मागणीसाठी दोन हजार किलोमीटर दूर मंदिरात पोहचला. भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीसमोर त्याने आपली इच्छा व्यक्त केली.