मुंबईत होणाऱ्या ‘इंडीया’ च्या बैठकीत आणखी पक्ष सामील होतील, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा दावा

भाजपाच्या विरोधात विरोधी पक्ष एकत्र येत असून त्यांनी 'इंडीया' गटाची स्थापना केली आहे. त्यांची मुंबईत 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी दोन दिवसीय बैठक होत आहे.

मुंबईत होणाऱ्या 'इंडीया' च्या बैठकीत आणखी पक्ष सामील होतील, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा दावा
nitish kumar Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Aug 27, 2023 | 7:46 PM

पाटणा | 27 ऑगस्ट 2023 : मुंबईत विरोधी पक्षांनी स्थापन केलेल्या इंडीया आघाडीची बैठक येत्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी होत आहे. या बैठकीत काही राजकीय पक्षांची आम्हाला साथ मिळणार असल्याचा दावा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केला आहे. भाजपा विरोधात विविध पक्षांची मोट बांधण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या नितीश कुमार यांनी या संभाव्य साथीदारांची नावे मात्र सांगितली नाहीत. मात्र, याबैठकीत जागा वाटपाच्या निवडणूकीसंदर्भातील चर्चा होईल असे नितीश कुमार यांनी सांगितले.

भाजपाच्या विरोधात विरोधी पक्ष एकत्र येत असून त्यांनी ‘इंडीया’ ( इंडीयन नॅशनल डेव्हलपमेंटल इंक्लूसिव्ह अलायन्स ) स्थापना करण्यात आली आहे. पाटणा येथे पत्रकारांशी बोलताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितले की, आम्ही मुंबई होणाऱ्या आगामी बैठकीत पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणूकीसंदर्भात इंडीयाच्या रणनीतीवर चर्चा करणार आहोत. जागा वाटपासारख्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात येऊन अनेक अंजेड्यांना अंतिम रुप दिले जाईल. काही राजकीय पक्षही आमच्यात सामील होतील.

माझी अशी काही मागणी नाही

त्यांनी पुढे सांगितले की, आपण 2024 च्या लोकसभा निवडणूकीआधी जास्तीत जास्त पक्षांना एकत्र आणू इच्छीत आहे. आणि त्याच दिशेने काम करीत आहे…माझी स्वत:ची अशी काही इच्छा नाही. लोकसभा निवडणूकीसाठी सत्तारुढ भाजपाला हरविण्यासाठी 26 विरोधी पक्षांच्या इंडीया आघाडीच्या महिनाभरात दोन बैठका झाल्या आहेत. विरोधी पक्षांची पहीली बैठक 23 जून रोजी पाटणा येथे झाली. दुसरी बैठक 17-18 जुलै रोजी बंगळुरु येथे झाली. आता 31 आणि 1 सप्टेंबर अशी दोन दिवसी तिसरी बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली आहे.

'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला.
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण.
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?.
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?.
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले...
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले....
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?.
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?.
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच..
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.