विधानसभा अध्यक्ष निवडीवरुन सर्वोच्च न्यायालयात जोरदार खडाजंगी, दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद काय ?
सर्वोच्च न्यायालयात सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू असतांना ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद करत विधानसभा अध्यक्ष यांच्यासहित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड कशी चुकीची आहे यावर युक्तिवाद केला आहे.
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी ( Supreme Court ) आजपासून पुन्हा एकदा सुरू झाली आहे. यावेळी ठाकरे गट आणि शिदे गट यांच्यात जोरदार युक्तिवाद सुरू आहे. यावेळी विविध मुद्द्यावर युक्तिवाद सुरू असतांना राहुल नार्वेकर यांच्या विधानसभा अध्यक्ष निवडीवरुन दोन्ही बाजूच्या वकिलांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये घटनापिठाकडून राहुल नार्वेकर ( Rahul Narvekar ) यांना बहुमत मिळाले आहे. त्याच्यावर युक्तिवाद नको असे सांगण्यात आले होते. त्यावर ठाकरे गटाचे वकील यांनी युक्तिवाद करत विविध मुद्दे उपस्थित केले आहे. त्यावर शिंदे गटाच्या वकिलाने आक्षेप घेतला होता.
ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी राहुल नार्वेकर यांना बहुमत नाही असा मुद्दा मांडला आहे. राहुल नार्वेकर यांच्या निवडीसाठी भाजपने प्रस्ताव मांडला होता. त्यामुळे दुसऱ्या पक्षाच्या उमेदवारासाठी व्हीप कसा काय काढू शकतात असं सिब्बल म्हणाले.
विधानसभा अध्यक्ष निवडतांना शिवसेना आमदार यांना वगळण्यात आले तरी राहूल नार्वेकर यांना 123 मतं असायला पाहिजे होती. पण त्यांना 122 चं मत पडतात. त्यामुळे त्यांची निवड ही चुकीची असल्याचे कपिल सिब्बल यांनी म्हंटले आहे.
त्यामुळे विधानसभा अध्यक्ष यांची निवड चुकीची ठरल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवडही चुकीची ठरेल असाही युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी करत 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्दा ठासून सांगितला आहे.
त्यावरच शिंदे गटाचे वकील यांनी आक्षेप घेतला. 16 आमदार अपात्र झाले तरी नार्वेकर यांना बहुमत असते. मात्र, व्हीप आमच्याच बाजूने काढला आहे आणि तोच योग्य आहे. अजय चौधरी यांचा व्हीपचा यावेळेला उल्लेख केला आहे.
दहाव्या सूचित विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा उल्लेख नाही असेही कपिल सिब्बल यांनी म्हंटलेलं आहे. त्यावर शिंदे गटाचे वकील धीरज कौल यांनी आक्षेप घेत राहुल नार्वेकर यांची निवड कशी योग्य आहे याचा युक्तिवाद केला आहे.
दरम्यान ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जो युक्तिवाद केला त्यामध्ये त्यांनी राहुल नार्वेकर यांचीच निवड चुकीची असल्याचे म्हंटले आहे. त्यामध्ये 16 आमदार यांना कसं अपात्र केलं जाऊ शकतं याचे उदाहरण सिब्बल यांनी दिले आहे.
त्यामुळे सत्तासंघर्षाच्या सुनावणीत पहिल्या दिवशी कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाची बाजू मांडत असतांना विधानसभा अध्यक्ष यांची निवड कशी चुकीची आहे हे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच निवड चुकीचे ठरेल असाही दावा केला आहे.