A for अर्जुन, B For बलराम, या शाळेने ABCD च बदलून टाकली….; कारण तर वाचा…
शाळेत येणाऱ्या मुलांना इतिहास कळवा म्हणून या शाळेने आता नवीनच एबीसीडी तयार केली आहे.
नवी दिल्लीः उत्तर प्रदेश नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आताही एका नव्या गोष्टीमुळे उत्तर प्रदेश पुन्हा चर्चेत आले आहे. उत्तर प्रदेशमधील एका शाळेत एबीसीडीची सगळी परिभाषाच बदलून टाकण्यात आली आहे. कारण आपल्याला सर्वांना लहानपणापासून ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट हेच वाचण्यात आले होते. परंतु आता यूपीमधील एका शाळेत एबीसीडीची नवीन परिभाषा शिकवली जात आहे. शाळेतील अभ्यासच नाही तर नव्या शब्द संग्रहाचे पुस्तकंही छापण्यात आली आहेत. त्या पु्स्तकामधून आता येथे तुम्हाला ए फॉर अर्जुन, बी फॉर बलराम, सी फॉर चाणक्य हे पुस्तक वाचायला मिळणार आहे.
शाळेने या प्रकारची पुस्तक छापल्यानंतर आता या पुस्तकातील काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
त्यामुळे शाळेतील मुलंही आता ॲपल आणि बॉल ऐवजी अर्जुन आणि बलराम यांचा अभ्यास करत आहेत. व्हायरल होत असलेल्या पुस्तकाच्या छायाचित्रांमध्ये भारतीय पौराणिक इतिहासातून A ते Z पर्यंत असलेल्या सगळ्या शब्दांचा अर्थ काढण्यात आला आहे.
ज्या शाळेतील पुस्तकांतून हा बदल करण्यात आला आहे. ती शाळा लखनऊच्या अमीनाबाद इंटर कॉलेजची आहे. अमीनाबाद येथे असलेली ही शाळा 125 वर्षे जुनी आहे.
या शाळेतील विद्यार्थ्यांना ABCD शिकवले जात आहे मात्र ती नव्या एबीसीडी प्रमाणे शिकवली जात आहे. त्या एबीसीडीमध्ये भारतातील ऐतिहासिक आणि पौराणिक महापुरुषा संदर्भात छापण्यात आले आहे. या महापुरुषांच्या चित्रांसह माहितीही या पुस्तकातून देण्यात आली आहे.
या नव्या पुस्तकांबद्दल शाळेच्या मुख्याध्यापकांना विचारले असता त्यांनी सांगितले की, शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचा इतिहास विषयामध्ये ते अभ्यासात पारंगत नाहीत. त्यामुळे अशी पुस्तकं काढल्यास त्यांचे ज्ञान वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.