दोन भावांची प्रेम कहाणी, एकाचवेळी जन्म-मृत्यू; जीवनभर दिली एकदुसऱ्याला साथ
सकाळी चांदने सूरजला शोधण्याचा प्रयत्न केला. पण, सूरज यांचा मृत्यू झाला होता. ही बाब माहीत होताच काही तासांतच चांद हेही त्यांच्या खोलीत मृतावस्थेत सापडले.
जयपूर : जमिनीसाठी भावाभावाचे वाद झालेले आपण पाहतो. संपत्तीसाठी एकमेकांचा खून करण्याच्या घटनाही घडतात. पण, जयपूर येथील दोन भावांची (the story of brothers) प्रेम कहाणी काहीसी वेगळीचं आहे. दोन्ही भावांत शेवटपर्यंत एकमेकांबद्दल अतिशय प्रेम होते. काही तासांतच दोघांचेही प्राण गेले. दोन्ही भावांच्या मृत्यूनंतर कुटुंबात दुःखाचं वातावरण आहे. गावकरी या दोन्ही भावांच्या प्रेम कहाणीची चर्चा करत आहेत. जयपूर (Jaipur) जिल्ह्यातील मौजमाबाद क्षेत्रातील सावरदा गावातील ही घटना आहे.
१९३३ ला एकावेळी जन्म
सावरदा गावात १९३३ साली या दोन्ही भावांचा जन्म झाला. वडील रामदेव साहू यांनी मोठ्या मुलाचं नाव सुरज ठेवलं. लहान मुलाचं नाव चांद ठेवलं. दोन्ही भावांचं संगोपन एकाचवेळी झाले. दोघांचेही जगणे सोबत होते. सोबत झोपणे-खाणे पिणे सुरू होते. वयाने सारखे असल्याने एकाच वर्गात शिकले.
दोघांमध्ये एवढं प्रेम होतं की, एक आजारी पडला तर दुसराही रुग्णालयात जायचा. वयात आल्यानंतर दोघांचेही हरमाडा भागातील लग्न दोन सख्या बहिणींसोबत झाले. लग्नानंतरही दोन्ही कुटुंब एकत्र राहत होते. कुटुंब वाढत गेले. दोघेही वयस्क झाले. त्यानंतरही ते एकत्र कुटुंब पद्धतीत राहत होते.
मोठ्या भावाच्या मृत्यूने लहान भावाचे प्राणत्याग
हे दोन्ही भावांचं प्रेम रविवारी संपलं. रविवारी दुपारी मोठा भाऊ सूरज यांची प्रकृती खराब झाली. ९० वर्षीय सूरज यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सूरज यांनी मृत घोषित केले. चांदला सूरज यांच्या मृत्यूची बातमी दिली गेली नाही. रविवारी सूरज यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सकाळी चांदने सूरजला शोधण्याचा प्रयत्न केला. पण, सूरज यांचा मृत्यू झाला होता. ही बाब माहीत होताच काही तासांतच चांद हेही त्यांच्या खोलीत मृतावस्थेत सापडले. सोमवारी सकाळी कुटुंबीयांना चांदच्या पार्थिवावरही अंत्यसंस्कार केले. गावात आता या दोन्ही भावांच्या प्रेम कहाणीची चर्चा होत आहे.