कॉंग्रेसच्या महाअधिवेशनात मोठा निर्णय, कॉंग्रेस वर्किंग कमिटीच्या निवडी निवडी कोणत्या पद्धतीने होणार ?
कॉंग्रेस पक्षात राष्ट्रीय अध्यक्ष निवडीत लोकशाही पद्धतीने मतदान करण्यात आले होते. त्यामुळे वर्किंग कमिटीच्याबाबत काय निर्णय होणार याकडे कॉंग्रेसचे नेते आणि पदाधिकारी यांच्या नजरा लागून होत्या.
संदीप राजगोळकर, टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली : कॉंग्रेस पक्षाचे छत्तीसगडमधील रायपुर येथे महाअधिवेशन ( Congress Session Raipur ) पार पडत आहे. या महाअधिवेशनात कॉंग्रेसचे सर्वच नेते उपस्थिती लावणार आहे. तीन दिवसीय अधिवेशनात राजकीय, आर्थिक, रोजगार, कृषि, आंतरराष्ट्रीय विषयांवर मंथन होणार आहे. मात्र, याच दरम्यान कॉंग्रेस वर्किंग कमिटीच्या ( Congress working Committee ) बाबत काय निर्णय होतो याकडे संपूर्ण देशातील कॉंग्रेसच्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागून होते. अध्यक्ष निवडीसारखी प्रक्रिया होईल की थेट अध्यक्षांना अधिकार देऊन निवडी केल्या जातील याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. त्याबाबतही निर्णय झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.
कॉंग्रेस पक्षात यापूर्वी राष्ट्रीय अध्यक्ष निवड करत असतांना लोकशाही पद्धतीने मतदान करून अध्यक्ष निवडण्यात आला होता. त्यामध्ये कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष मलिकाअर्जुन खर्गे यांची निवड झाली होती.
त्यानंतर मात्र इतर पदांच्या निवडणुका होणार की अध्यक्ष निवडणार याबाबत संभ्रम होता. त्याबाबत महाअधिवेशन शिबिरात त्यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामध्ये कॉंग्रेस वर्किंग कमिटीच्या निवडी हे अध्यक्ष करणार आहे.
काँग्रेस वर्किंग कमिटीसाठी निवडणूक होणार नसल्याचे समोर आले आहे. वर्किंग कमिटीच्या नियुक्तींबाबत अध्यक्षांना सर्व अधिकार देण्यात आले आहे. रायपूर महाअधिवेशनात याबाबत सहमतीने निर्णय झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.
अध्यक्षपदासाठी निवडणुकीनंतर वर्किंग कमिटीच्याही निवडणुका घेण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्यावर निवडणूक न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अध्यक्षांना सर्व अधिकार देण्यात आल्याने वर्किंग कमिटीच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
याशिवाय कॉंग्रेस वर्किंग कमिटीच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला असला तरी महाराष्ट्रातून या वर्किंग कमिटीमध्ये कोणाची निवड होणार ? याशिवाय येणाऱ्या काळातील निवडणुका बघता महाअधिवेशनात काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
कॉंग्रेसच्या वर्किंग कमिटी आपली वर्णी लागावी यासाठी कॉँग्रेस मधील अनेक नेत्यांनी आपली ताकद लावण्यास सुरुवात केली होती. निवडणुका झाल्यातर त्यामध्ये कोण बाजी मारणार यासाठी रणनीती ठरवली जात होती.
अशा वेळी महा अधिवेशनात वर्किंग कमिटीचा निर्णय झाल्याने आता अध्यक्ष कोणाच्या खांद्यावर वर्किंग कमिटीची जबाबदारी टाकतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र कॉंग्रेसमधील अंतर्गत कलाहात कोणाची वर्णी लागते याशिवाय पटोले की थोरात कुणाचं पारडं जड राहणार हे सुद्धा यावरून स्पष्ट होणार आहे.