Video: हॉस्पीटलने ना स्ट्रेचर दिला ना ॲम्बुलन्स… शेवटी खांद्यावरुन घरी नेला बायकोचा मृतेद
उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात माणुसकीला लाजवमारी ही घटना घडलेय. जिल्हा रुग्णालयात एका महिलेचा मृत्यू झाला. मात्र, हॉस्पीटलने ना स्ट्रेचर दिला ना ॲम्बुलन्स. पतीने खांद्यावरुन पत्नीचता मृतदेह नेला. मृतदेह खांद्यावर घेऊन हा पती अनेक तास रुग्णवाहिकेच्या शोधात भटकत राहिला. अखेरीस खासगी रुग्णवाहिकेने मृतदेह गावी नेला.
हाथरस : भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. मागील 75 वर्षात भारताने उल्लेखनीय प्रगती केली आहे. देश यशाची अनेक शिखरे चढत असताना अनेक ठिकाणी नागरिकांना मूलभूत समस्यांसाठी देखील झगडावे लागत आहे. अनेक नागरिक मुलभूत सोयी सुविधांपासून वंचित आहेत. याचे जिवंत उदाहरण उत्तर प्रदेशात(Uttar Pradesh) पाहायला मिळाले आहे. हॉस्पीटलने ना स्ट्रेचर दिला ना ॲम्बुलन्स… शेवटी एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा मृतदेह खांद्यावरून उचलून नेला. यानंतर त्याने खाजगी ॲम्बुलन्सने हा मृतदेह घरी आणला.
उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात माणुसकीला लाजवमारी ही घटना घडलेय. जिल्हा रुग्णालयात एका महिलेचा मृत्यू झाला. मात्र, हॉस्पीटलने ना स्ट्रेचर दिला ना ॲम्बुलन्स. पतीने खांद्यावरुन पत्नीचता मृतदेह नेला. मृतदेह खांद्यावर घेऊन हा पती अनेक तास रुग्णवाहिकेच्या शोधात भटकत राहिला. अखेरीस खासगी रुग्णवाहिकेने मृतदेह गावी नेला.
सबका साथ, सबका विकास अशी उत्तर प्रदेशच्या योगी सरकारची घोषणा आहे. मात्र, हाथरसचे आरोग्य विभागाने आपल्या कृतीने उत्तर प्रदेश सरकारच्या योजनेलाच काळीमा फासला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
हातरस जंक्शन परिसरातील चिंतापूर बदन या गावातील रहिवासी असलेल्या प्रवेश राम खिलाडी यांच्या पत्नीची सकाळी अचानक प्रकृती बिघडली आणि ती बेशुद्ध झाली. घाबरलेल्या नातेवाईकांनी तिला बागला जिल्हा रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी या महिलेला मृत घोषित केले.
अब हाथरस में मानवता शर्मसार…
शव वाहन तो दूर अस्पताल प्रशासन ने स्ट्रैचर तक नहीं दिया. परिवार वाले एंबुलेंस तलाशते रहे तो पति कंधे पर पत्नी का शव लटकाए घूमता रहा. आखिरकार प्राइवेट एंबुलेंस से शव को परिजन घर ले गए. pic.twitter.com/ZmiOZL9z9d
— Nitesh Ojha (@niteshojha786) August 2, 2022
रुग्णालयाने मदत दिली नाही
महिलेचा मृतदेह घरी नेण्यासाठी तिच्या पतीने रुग्णालयाकडे ॲम्बुलन्सची व्यवस्था करावी अशी मागणी केली. मात्र, रुग्णालयाने साधं स्ट्रेचरही दिले नाही. या महिलेचा पती तिचता मृतदेह खांद्यावर घेऊन फिरत राहिला. त्याने एक दोन सरकारी रुग्णालयाकडे ॲम्बुलन्स मागीतली. मात्र कुणहीरही मदत केली नाही. अखेरीस खाजगी ॲम्बुलन्सने हा मृतदेह त्यांनी घरी नेला.
प्रकरणाच्या चौकशीचे आदेश
सीएमओ डॉ मनजीत सिंह यांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, आता अशा असंवेदनशील रुग्णालयातील डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार की चौकशीनंतरच प्रकरण बंद होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. डीएम रमेश रंजन यांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ एडीएम बसंत अग्रवाल यांना या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले.