मला हे आई-बाबा नकोयत, 24 वर्षांची ती कोर्टात गेली, वाद घातला,अखेर ‘हा’ निर्णय आला, सगळ्यांनीच वाचायला हवा!

वयाच्या 24 व्या वर्षी या तरुणीला आई-वडिलांचा त्याग करावा वाटला, त्यामागेदेखील एक गंभीर कारण आहे. ही मुलगी 1999 मध्ये गांधीधाम इथं जन्मली होती.

मला हे आई-बाबा नकोयत, 24 वर्षांची ती कोर्टात गेली, वाद घातला,अखेर 'हा' निर्णय आला, सगळ्यांनीच वाचायला हवा!
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Apr 07, 2023 | 9:47 AM

अहमदाबाद : गुजरातमधील (Gujrat) एका तरुणीने 24 व्या वर्षी कोर्टात आपल्याच आई-वडिलांविरोधात कोर्टात (Court) धाव घेतली. मला माझ्या या आई-वडिलांचा त्याग करायचाय, अशी इच्छा व्यक्त केली. यासाठी तिने अनेक कारणंही दिली. पण गुजरातमधील मिर्झापूर कोर्टात झालेल्या या विशेष खटल्याचा निकालही सगळ्यांनीच वाचला पाहिजे. कारण कोर्टाने या मुलीची याचिका फेटाळून लावली. 24 वर्षांची ही तरुणी सदर पालकांची दत्तक मुलगी आहे. भारतातील दत्तक विधान कायद्यानुसार, एकदा दत्तक घेतलेलं अपत्य पुन्हा जैविक पालकांना परत करता येत नाही. ज्यांनी दत्तक घेतलंय, त्या पालकांनी या अपत्याला आपल्या पाल्याप्रमाणेच वागणूक दिली पाहिजे. तर पाल्यानेदेखील मोठेपणी जैविक पालकांप्रमाणेच त्यांची कर्तव्य बजावली पाहिजेत. या तरुणीने ज्या कारणांसाठी आई-वडिलांचा त्याग करण्याची मागणी केली, ते कारणदेखील जास्त महत्त्वाचं आहे.

का सोडावे वाटले आई-वडील?

वयाच्या 24 व्या वर्षी या तरुणीला आई-वडिलांचा त्याग करावा वाटला, त्यामागेदेखील एक गंभीर कारण आहे. ही मुलगी 1999 मध्ये गांधीधाम इथं जन्मली होती. ७ महिन्यानंतर तिच्या काका-काकूंनीच तिला दत्तक घेतलं. 2007 मध्ये रितसर कागदपत्र तयार झाले. तिचे दत्तक आई-वडील जयपूरमध्ये राहतात. तर जैविक पालक अहमदाबादमध्ये. वाद झाल्यानंतर सध्या ही तरुणी जैविक पालकांकडे राहतेय.

काय घडलं कारण?

या तरुणीने दावा केला की, उदयपूर येथे एका डेंटल सर्जरी कोर्सला तिला प्रवेश मिळाला होता. पण दत्तक पालकांची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने तिला कॉलेजचे शुल्क भरता आले नाही. तिने जैविक पालकांकडे मदत मागितली. त्यांनी फिलिपाइन्समध्ये तिच्या शिक्षणाची व्यवस्था केली. पण यासाठी दत्तक पालकांकडून कागदपत्र हवे होते. त्यांनी ते देण्यास नकार दिल्याचा आरोप मुलीने केलाय. जैविक पालकांची मदत घेऊ नको, असं त्यांनी सांगितलं. अखेर त्या मुलीचं अॅडमिशन रद्द झालं.

कोर्टात धाव, निकाल काय?

दत्तक पालकांमुळे जन्म देणाऱ्या पालकांना आर्थिक नुकसान भोगावे लागले, असा आरोप तरुणीने केलाय. त्यामुळे तिने दत्तक पालकांकडे राहणं बंद केलंय. त्यांच्या वाईट वागणुकीमुळे त्यांच्याशी बोलणंही सोडून दिल्याचं तरुणीने कोर्टात सांगितलं. ही दत्तक प्रक्रियाच रद्द करावी, अशी मागणी केली.

कोर्टात ही मुलगी आली, पण दत्तक आई-वडील उपस्थित नव्हते. त्यांनी मुलीशी वाईट वर्तन केल्याचे पुरावेही कोर्टासमोर मांडले गेले नाहीत. त्यामुळे कोर्टाने सदर मुलीची याचिका फेटाळून लावली. तसेच हिंदू धर्मातील रितींचा दाखला दिला. हिंदू संस्कृतीत दत्तक हा एक संस्कार मानला जातो. भारतातील घटनेतील कलम १५ नुसार, जैविक पालकांप्रमाणेच दत्तक आई-वडिलांना पाल्याप्रती सगळी कर्तव्य पार पाडावी लागतात. तसेच जैनिक मुलगा किंवा मुलीप्रमाणेच दत्तक अपत्यालाही दत्तक पालकांप्रती कर्तव्य पार पाडावी लागतात.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.