दोन दिवस तो लिफ्टमध्ये अडकला, तीन कर्मचारी सस्पेंड झाले
या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण संचालक विभागाला दिल्याचे आरोग्य राज्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी फेसबुक पोस्टवर म्हटले आहे. ही लिफ्ट रेग्युलर वापरली जात नव्हती असे रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे.
सरकारी इस्पितळाच्या एका लिफ्टमध्ये तो तब्बल दोन दिवस अडकून पडला. घरच्यांना मिसिंगची तक्रार दाखल केली. अखेर सोमवारी सरकारी इस्पितळाचे लिफ्ट्समन नोकरीवर आले तेव्हा या इसमाची सुटका झाली. गेल्या दोन दिवसात या इसमाची अवस्था बिघडल्याने त्याला आता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात तीन कर्मचाऱ्यांना सस्पेंड करण्यात आले आहे. लिफ्टने प्रवास करणाऱ्यांच्या हृदयात धडकी भरवणारी घटना नेमकी काय आहे पाहूयात…
केरळच्या आरोग्य मंत्रालयाने थिरुवंनतपुरम गर्व्हमेंट मेडीकल कॉलेज हॉस्पिटलच्या तीन कर्मचाऱ्यांना सस्पेंड केले आहे. 59 वर्षांचे रवींद्र नायर ( रा. उल्लूर ) मेडीकल चेकअप साठी शनिवारी या रुग्णालयात गेले होते. त्यावेळी ते रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये तब्बल 48 तास अडकून पडले. ज्यावेळी सोमवारी कर्मचारी कामावर आला तेव्हा त्यांवेळी नायर यांची अखेर सुटका झाली. त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. नायर यांना रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्ट पकडली.परंतू लिफ्ट खाली गेली आणि तिचे दरवाजे लॉक झाले. त्यांनी मदतीसाठी धावा घातला. अलार्म वाजविला परतू कोणी मदतीला आले नाही. नेमकी त्यांच्या मोबाईलची बॅटरी संपल्याने त्यांना घरच्यांना मदतीला बोलविता आले नाही. त्यांचा मोबाईल लागत नसल्याने घरत्यांनी पोलिसांकडे हरविल्याची तक्रार दाखल केली.
सोमवारी लिफ्टमन आला…
आपण लिफ्टमधील सर्व इमर्जन्सी नंबर लावून पाहीले मात्र कोणीच मदतीला आले नाही. नंतर माझ्या ध्यानात आले की महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने आणि रविवारी सुट्टी असल्याने मी सोमवारपर्यंत वाट पाहण्याचा निर्णय घेतला. आपल्याला सोमवारी हॉस्पिटल सुरु झाल्यावर कोणीतरी वाचवायला येईल या अशी आशा होती. त्यानंतर सोमवारी लिफ्टमन आल्यानंतर आपली सुटका झाल्याचे नायर यांनी म्हटले आहे. सोमवारी लिफ्टमन आला त्यानंतर मी अलार्म वाजविला. त्यानंतर लिफ्टचा दरवाजा ताकदीने उघडला गेला. नायर यांचा मुलगा हरिशंकर यानी सांगितले की माझे वडील दोन दिवस लिफ्टमध्ये अकल्याने खूपच हादरले आहेत. त्यांनी लिफ्टच्या आतील सर्व अलार्म वाजविले परंतू कोणी देखील मदतीला आले नाही.