Fact Check: IAS सोनकरांनी खरंच हॉस्पिटलमध्ये जाऊन बेडवर पाय ठेवत रुग्णांशी संवाद साधला? व्हायरल होत असलेल्या फोटोचं सत्य काय?

डॉक्टर बनलेले आयएएस अधिकारी जगदीश सोनकर यांचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर बराच गदारोळ झाला होता. त्यानंतर त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून आपल्या वर्तनाबद्दल माफीही मागितली होती.

Fact Check: IAS सोनकरांनी खरंच हॉस्पिटलमध्ये जाऊन बेडवर पाय ठेवत रुग्णांशी संवाद साधला? व्हायरल होत असलेल्या फोटोचं सत्य काय?
आयएएस सोनकर Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 5:12 PM

Fact Check: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर (Social Media) वर्तमानपत्रातील एक फोटो मोठ्या प्रमाणावर व्हारल होतं आहे. ज्यामुळे IAS केडरमध्ये जोरदार चर्चा होताना दिसत आहे. तर यावरून IAS अधिकारी आपली नाराजी व्यक्त करत आहेत. छत्तीसगडच्या एका रूगणालयातला (Hospital) फोटो व्हायरल होताना दिसत असून ज्यात एक महिला रूग्ण आपल्या एका लहान मुलासोबत बेडवर बसली आहे. तर त्या महिला रूग्णासोबत कोणीतरी बोलत आहे. मात्र बोलत असताना त्याचा पाय त्या रूग्णाच्या बेडवर आहे. हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरलं केला जात आहे. हा फोटो IAS सोनकर (IAS Sonkar) यांचा असल्याचे समोर आले आहे. मात्र ते त्यावेळी प्रशिक्षणार्थी अधिकारी होते. आणि ती त्यांची स्टाईल होती. मात्र आता हा फोटो व्हायरल केला जात असून तो सध्याचा आहे. आणि ही घटना ही आत्ताची असल्याचे म्हटले जात आहे.

IAS अधिकारी सोनकर

यासंदर्भात नक्की सत्य काय आहे हे पाहण्याचा प्रय्त्न केला असता, IAS अधिकारी सोनकर हे त्यावेळी प्रशिक्षणार्थी अधिकारी होते. तर त्यांची त्यावेळी ड्यूटी ही छत्तीसगडमध्ये होती. त्यावेळी त्यांची बोलण्याची स्टाईल ही तशीच होती. हा त्यावेळचा फोटो आहे. तो फोटो पोस्ट करत एका ट्विटर यूजरने लिहिले की, रूग्णाला भेटायला गेलेल्या प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी सोनकर यांचा अंदाज. तसेच दुसऱ्या एका युजरंने लिहले की, “जैसे जहां के नदी नवारे, तैसे तहां के भरका. जैसे जाके बाप माहतारी तैसे ताके लरका. IAS अधिकारी झाले आहेत. मात्र संस्कारही येतीलच याची शाश्वती नाही. असं म्हणत लोक आता आयएएस अधिकाऱ्याच्या संस्कारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. या देशी म्हणीचा अर्थ असा आहे की, ज्या ठिकाणचे नद्या-नाले असतात, तसेच तेथील तलाव ही असतात. तर ज्यांचे पालक असे असतात तशी त्यांची मुले असतात.

फोटो जवळपास 6 वर्षे जुना

याच ट्विटमध्ये छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनाही या घटनेची दखल घेण्याची विनंती करण्यात आली आहे. हा फोटो फेसबुकवरही खूप शेअर केला जात आहे. मात्र जेव्हा तथ्य पडताळण्यात आल्यावर हेच समोर आले की, हा फोटो जवळपास 6 वर्षे जुना आहे. त्यावेळी छत्तीसगडमध्ये काँग्रेस नसून भाजपचे सरकार होते आणि डॉ.रमण सिंग मुख्यमंत्री होते.

सत्य कसे कळले?

व्हायरल बातम्यांमधले चित्र उलटे शोधल्यावर आम्हाला ते “द व्हॉईस ऑफ सिक्कीम” नावाच्या फेसबुक पेजवर सापडले. येथे ते 5 मे 2016 रोजी पोस्ट केले होते. यावरून ही घटना अलीकडची नाही हे सिद्ध होते.

कीवर्ड सर्चच्या मदतीने शोध घेतल्यावर, आम्हाला 2016 साठी “डेक्कन क्रॉनिकल” चा अहवाल सापडला. हा अहवाल 10 मे 2016 रोजी प्रसिद्ध झाला. डॉक्टर बनलेले आयएएस अधिकारी जगदीश सोनकर यांचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर बराच गदारोळ झाल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. गदारोळ वाढत असताना जगदीश सोनकर यांनी फेसबुकच्या माध्यमातून आपल्या वर्तनाबद्दल माफीही मागितली होती.

खेद व्यक्त केला होता

तसेच “india.com” नावाच्या वेबसाइटवर एक बातमी आहे. ज्यामध्ये जगदीश सोनकर यांची फेसबुक पोस्ट वाचली जाऊ शकते. ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या वागण्याबद्दल खेद व्यक्त केला होता. त्यात त्यांनी लिहिले होते की, माझ्या या वागण्याला कोणत्याही प्रकारे न्याय्य ठरवता येणार नाही. आणि त्यासाठी मी बिनशर्त माफी मागतो. या कृतीमुळे आयएएस अधिकाऱ्यांची प्रतिमा कशी डागाळली हे मला माहीत आहे. मी सर्वांची माफी मागतो.

शिष्टाचार शिकवा

तसेच अधिक शोध घेतल्यावर इतर ही काही बातम्या मिळाल्या ज्यात तत्कालीन मुख्यमंत्री रमण सिंह यांनी आपल्या मुख्य सचिवांना आयएएस सोनकर यांना शिष्टाचार शिकवा असे म्हटले होते.

इतर बातम्या :

Municipality Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील ‘सुप्रीम’ सुनावणी पुढे ढकलली! आता कधी सुनावणी?

Madhav Godbole passed away : निवृत्त केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांचं निधन; पुण्यातल्या राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

Breaking : तब्बल 205.6 किलो हेरॉईनसह 394 मेट्रिक टन जिप्सम पावडरही जप्त! गुजरातमध्ये पुन्हा मोठा अंमलीसाठा हस्तगत

मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.