पोलीसाचं घर डोळ्यासमोर कोसळलं तरी दु:ख विसरुन काही तासांत जॉईन केली ड्यूटी

आपले घर वाहून गेल्यानंतर गुलेरीया यांनी म्हटले की त्यांचे घर तीन मजली होते. त्यांनी भारतीय सैन्यातून निवृत्ती घेऊन घरासाठी एक कोटी रुपये खर्च केले होते.

पोलीसाचं घर डोळ्यासमोर कोसळलं तरी दु:ख विसरुन काही तासांत जॉईन केली ड्यूटी
ashok guleriyaImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Aug 19, 2023 | 2:06 PM

नवी दिल्ली | 19 ऑगस्ट 2023 : हिमाचल प्रदेशात भूस्खलन, दरडीने घर आणि इमारती कोसळून नैसर्गिकाचे रौद्र रुप प्रथमच पहायला मिळत आहे. त्यामुळे या भागात निसर्गाने अगदी कहर केला आहे. आतापर्यंत 71 जणांचा यात मृत्यू झाला आहे. येथील 54 वर्षीय अशोक गुलेरीया हे भारतीय सैन्यातून लान्स नायक पदावरुन निवृत्त होऊन सिमलात ते हेड कॉन्स्टेबल म्हणून तैनात होते. त्यानी सैन्यातून निवृत्तीनंतर मिळालेल्या पैशातून उभारलेले घर दरडीत कोसळले त्यांच्या डोळ्यासमोर ही घटना घडली. परंतू त्यांनी न डगमगता दु:ख विसरुन ड्यूटी जॉईन केली आहे.

अशोक गुलेरीया लान्स नायक म्हणून भारतीय सैन्यातून निवृत्त होऊन सिमला पोलिस दलात ते हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांना मंडी जिल्ह्यात आपल्या गावी 80 लाख रुपये खर्च करून घर बांधले होते. त्यानंतर फर्नीचर आणि इंटेरिअरवर खर्च केले. एकुण घरासाठी एक कोटी रुपये खर्च झाल्यानंतर 14 ऑगस्ट रोजी सकाळी हिमाचल प्रदेशातील भूस्खलनात त्यांचे घर वाहून गेले. त्याच्या डोळ्यासमोर ही घटना घडली. तरीही हे दु:ख विसरुन ते काही तासांत आपले कर्तव्य निभावण्यासाठी ते ड्यूटीवर हजर झाले आहेत.

घर तर गेले परंतू नोकरी आहे

आपले घर वाहून गेल्यानंतर गुलेरीया यांनी म्हटले की त्यांचे घर तीन मजली होते. त्यांनी एक कोटी खर्च केला होता. ते घराबाहेर उभी असलेली कारही काढू शकले नाहीत. कारण रस्ता आधीच तुटला होता. गुलेरिया यांचे घर कोसळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहून अनेकांना वाईट वाटू शकते. परंतू डोळ्यासमोर स्वत:चे घर वाहून जाणे हे पाहून ते बांधणाऱ्याला काय वाटलं असेल त्याची कल्पना करावी. त्यानी घर गमावल्यानंतर ते काही तासांत ड्यूटीवर गेले. गुलेरिया दु:खी आवाजात म्हणाले की घर तर गेले परंतू नोकरी आहे. त्यामुळे कर्तव्याचं पालन करायला हवे..

अनेक मृतदेहांची ओळख पटली नाही

गुलेरीया त्यांच्या पत्नी सह सिमलात राहतात. गावातील घरी येत जात होते. त्यांच्या मुलीचे लग्न झाले आहेत. तर मुलगा इंजिनिअर असून तो चंदीगडमध्ये काम करतो. सरकारने तातडीची मदत म्हणून पाच हजार रुपये जाहीर झाले आहे. ते त्यांनी घेतले नाही. सिमलात पावसाने अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. अनेकांची ओळख देखील पटलेली नाही.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.