अण्णा हजारे यांच्या आंदोलनातील सामान्य कार्यकर्ता ते दिल्लीचे मुख्यमंत्री, कसा आहे अरविंद केजरीवाल यांचा प्रवास

Arvind Kejriwal Biography | 11 वर्षांपूर्वी अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात एका अनोळखी व्यक्तीने पक्ष तयार केला. मुख्यमंत्री झाला. पंजाबमध्ये काँग्रेससह भाजपला पण पुरुन उरला. ही व्यक्ती अरविंद केजरीवाल आहे. दिल्लीच्या या मुख्यमंत्र्याला कथित दारु घोटाळ्याप्रकरणात ED ने अटक केली. सर्वसामान्य कार्यकर्ता ते दिल्लीचे मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास लक्षवेधी आहे.

अण्णा हजारे यांच्या आंदोलनातील सामान्य कार्यकर्ता ते दिल्लीचे मुख्यमंत्री, कसा आहे अरविंद केजरीवाल यांचा प्रवास
अण्णा हजारे यांच्यासह अरविंद केजरीवालImage Credit source: गुगल
Follow us
| Updated on: Mar 22, 2024 | 9:16 AM

दिल्लीतील कथित दारु घोटाळ्यात अखेर गुरुवारी रात्री ED ने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. त्यापूर्वी त्यांना अनेकदा समन्स बजावण्यात आले होते. गुरुवारी त्यांची अगोदर दोन तास चौकशी झाली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. यापूर्वी ईडीने त्यांचे सहकारी आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांना अटक केलेली आहे. ही त्यानंतरची सर्वात मोठी कारवाई मानण्यात येते. या कारवाईनंतर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी जोरदार प्रदर्शन केले. अटकेविरोधात केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. याप्रकरणी आज 22 मार्च रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होईल.

हरियाणातील खेडा हे मुळगाव

अरविंद केजरीवाल यांचा जन्म 16 ऑगस्ट 1968 रोजी हरियाणातील सिवानी जिल्ह्यातील खेडा या गावात झाला होता. गोविंद राम आणि गीता देवी हे त्यांचे आई-वडील आहेत. त्यांचे वडील एक इलेक्ट्रिकल इंजिनियर होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण हिस्सार येथील कॅम्पस स्कूलमध्ये आणि नंतर सोनीपतमधील होली चाईल्ड शाळेत झाले. ते 1985 मध्ये IIT-JEE परीक्षा उत्तीर्ण झाले. मॅकेनिकल इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी IIT खडगपूर येथून पदवी घेतली. 1989 मध्ये केजरीवाल जमशेदपूर येथे टाटा स्टीलमध्ये रुजू झाले. 1992 मध्ये प्रशासकीय सेवा परीक्षेसाठी त्यांनी टाटा स्टीलला रामराम ठोकला.

हे सुद्धा वाचा

1995 मध्ये UPSC परीक्षा, झाले IRS अधिकारी

1995 मध्ये अरविंद केजरीवाल केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांची भारतीय महसूल सेवेसाठी (IRS) निवड झाली. त्यांनी आयकर विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून काम पाहिले. त्यानंतर त्यांनी उच्च शिक्षणासाठी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. 2002 मध्ये नोकरीत रुजू झाले. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी 18 महिने विना वेतन सुट्टीसाठी अर्ज केला. ही सुट्टी मंजूर झाली. 2006 मध्ये अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्लीतील संयुक्त आयकर आयुक्त पदाचा राजीनामा दिला. 2011 मध्ये केजरीवाल यांनी नोकरीतील नियमानुसार त्यांच्याकडील थकीत 9 लाख 27 हजार 787 रुपये सरकार दरबारी जमा केले.

भ्रष्टाचार आंदोलनात सक्रिय

2011 मध्ये अरविंद केजरीवाल हे सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या संपर्कात आले. त्यांनी लोकपाल कायद्यासाठी इंडिया अगेंस्ट करप्शन ग्रुपची (IAC) स्थापना केली. 16 ऑगस्टपासून ते दिल्लीत रामलीला मैदानात अण्णा हजारे यांच्यासह उपोषणाला बसले. हे आंदोलन 28 ऑगस्टपर्यंत चालले. त्यावेळी या आंदोलनात किरण बेदी, कुमार विश्वास, संजय सिंह आणि मनीष सिसोदिया यांनी महत्वाची भूमिका निभावली. अरविंद केजरीवाल हे या आंदोलनाचा अण्णा हजारे यांच्यानंतरचा मुख्य चेहरा ठरले.

2013 मध्ये सरकार, पहिल्यांदा मुख्यमंत्री

अरविंद केजरीवाल यांनी 2 ऑक्टोबर 2012 रोजी राजकीय पक्ष गठित केला. 24 नोव्हेंबर 2012 रोजी आम आदमी पक्ष असे नामाकरण झाले. यावरुन त्यांनी अण्णा हजारे यांची नाराजी ओढावून घेतली. 2013 मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत या पक्षाने अभुतपूर्व विजय मिळवला. या नवख्या पक्षाने कमाल केली. त्यांनी काँग्रेसच्या तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा पराभव केला. काँग्रेसनेच त्यांना बाहेरुन पाठिंबा दिल्याने केजरीवाल यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. 2015 मधील निवडणुकीत केजरीवाल आम आदमी पक्षाने सर्वाधिक 67 जागा खिशात घातल्या.

तिसऱ्यांदा पुन्हा मुख्यमंत्री

2020 मध्ये भाजपने त्यांना हरविण्यासाठी जंग जंग पछाडले. पण आम आदमी पक्षाने विधानसभा निवडणुकीत 70 मधील 62 जागांवर विजय मिळवला. 16 फेब्रुवारी 2020 रोजी, ज्या रामलीला मैदानावर त्यांनी कधीकाळी उपोषण केले होते. त्याच मैदानावर तिसऱ्यांद मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अरविंद यांचे लग्न सुनिता केजरीवाल यांच्याशी झाले आहे. दोघांना दोन मुलं आहेत. त्यांच्या मुलीचे नाव हर्षिता आहे. तर मुलाचे नाव पुलकित आहे. ते पत्नी आणि मुलांसह दिल्लीत मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात राहतात.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.