Electricity Bill : अबब!! लाईटचे बिल 3,419 कोटी रुपये! आकडा ऐकून वृद्ध पोहोचला रुग्णालयात

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरची रहिवासी असलेल्या प्रियंका गुप्ता यांना हे तब्बल 3,419 कोटी रुपयांचे वीज बिल आले. बिलाचा आकडा पाहताच त्यांना मोठा धक्का बसला.

Electricity Bill : अबब!! लाईटचे बिल 3,419 कोटी रुपये! आकडा ऐकून वृद्ध पोहोचला रुग्णालयात
राज्यात ऐन सणासुदीच्या काळात वीज संकट? Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 27, 2022 | 1:33 AM

ग्वाल्हेर : उन्हाळ्यात दिवसरात्र फिरणारे पंखे, अनेक घरांमध्ये चालू ठेवला जाणारा एसी.. त्यामुळे लाईटचे वाढीव बिल येणे हे स्वाभाविकच मानले जाते. एरव्ही दर महिन्याला चारशे-पाचशेच्या आसपास येणारे बिल जास्तीत जास्त दुपटीने अधिक अर्थात 1 हजार ते 1200 च्या आसपास लाईटबील (Electricity Bill) येऊ शकेल, असा अंदाज बांधला जातो. पण हेच बिल जर लाख किंवा कोटीच्या घरात गेले तर …. ही नुसती कल्पनादेखील नकोशी करून सोडेल. अर्थात लाख किंवा कोटीच्या घरातील आकडा नक्कीच घाम फोडेल. पण एका वीजग्राहकाला आलेल्या लाइट बिलने त्या घरातील वृद्ध इसमाला थेट रुग्णालया (Hospital)त दाखल करावे लागले. कारण लाईट बिलचा आकडा एक-दोन लाख किंवा कोटी नव्हता तर ते बिल चक्क 3,419 कोटी रुपये आलेले. महिलेच्या हातात हे लाईट बिल पडताच तिच्या सासऱ्याला मोठा धक्का (Shock) बसला आणि त्या वृद्धाला लगेचच रुग्णालयात दाखल करावे लागले.

वीज कंपनीच्या चुकीमुळे आकड्यामध्ये झाला घोळ

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरची रहिवासी असलेल्या प्रियंका गुप्ता यांना हे तब्बल 3,419 कोटी रुपयांचे वीज बिल आले. बिलाचा आकडा पाहताच त्यांना मोठा धक्का बसला. याचदरम्यान प्रियंका यांचे सासरे स्वतःला सावरू शकले नाहीत. त्यांनी मोठा धक्का घेतल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. मध्य प्रदेश सरकारच्या अखत्यारीत वीज कंपनीने केलेल्या चुकीमुळे लाईट बिलाच्या आकड्यामध्ये घोळ झाला. ही चूक कबूल करीत वीज कंपनीने सुधारित 1,300 रुपयांचे बिल जारी केले. या चुकीच्या दुरुस्तीमुळे ग्वाल्हेर शहरातील शिव विहार कॉलनीतील रहिवासी असलेल्या व मोठ्या चिंतेत सापडलेल्या गुप्ता कुटुंबाला दिलासा मिळाला.

वीज वितरण कंपनीच्या महाव्यवस्थापकांनी कर्मचाऱ्यांची चूक केली कबूल

या प्रकाराबाबत तक्रारदार सुश्री गुप्ता यांचे पती संजीव कांकणे यांनी सांगितले की, जुलै महिन्याच्या घरगुती वापराच्या वीज बिलाचा मोठा आकडा पाहून त्यांचे वडील आजारी पडले. 20 जुलै रोजी हाती पडलेले लाईट बिल मध्यप्रदेशच्या मध्य क्षेत्र विद्युत वितरण कंपनी (MPMKVVC) च्या पोर्टलद्वारे क्रॉस-व्हेरिफिकेशन करण्यात आले होते. परंतु ते बरोबर असल्याचे आढळले, असा दावा त्यांनी केला. नंतर राज्य वीज कंपनीने बिल दुरुस्त केले. एमपीएमकेव्हीव्हीसीचे महाव्यवस्थापक नितीन मांगलिक यांनी अवाढव्य वीज बिलाला आपल्याच कर्मचाऱ्यांनी चूक कारणीभूत असल्याचे मान्य केले आणि त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याचे सांगितले. सॉफ्टवेअरमध्ये वापरलेल्या युनिटच्या जागी एका कर्मचार्‍याने ग्राहक क्रमांक नोंदवला. त्यामुळे जास्त रकमेचे बिल आले. वीज ग्राहकाला 1,300 रुपयांचे सुधारित बिल जारी करण्यात आले आहे, असे मांगलिक यांनी स्पष्ट केले. (A resident of Gwalior in Madhya Pradesh has an electricity bill of Rs 3,419 crore)

हे सुद्धा वाचा

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.