प्रेमाचं प्रतिक मानलं जाणारा शुभ्र ताजमहाल होतोय हिरवा! काय आहे कारण?

प्रेमाचं प्रतिक मानलं जाणारा शुभ्र रंगाचा ताजमहाल हळूहळू हिरवा होत चालला आहे. एवढा मोठा बदल एका छोट्या किड्यामुळे होत असल्याचं समोर आलंय.

प्रेमाचं प्रतिक मानलं जाणारा शुभ्र ताजमहाल होतोय हिरवा! काय आहे कारण?
Follow us
| Updated on: Mar 01, 2021 | 3:51 PM

नवी दिल्ली : जगातील 7 आश्चर्यांपैकी एक, आपल्या सुंदरतेनं जगभरात ओळखला जाणारा आणि प्रेमाचं प्रतिक मानलं जाणारा शुभ्र रंगाचा ताजमहाल हळूहळू हिरवा होत चालला आहे. एवढा मोठा बदल एका छोट्या किड्यामुळे होत असल्याचं समोर आलंय. हा किडा गोल्डी काइरो नोमस म्हणून ओळखला जातो. यमुना नदीतून हे किडे ताजमहालावर जाऊन चिकटतात. जिथे हे किडे बसतात तिथला चमकदारपणा निघून जातो. अशास्थितीत ताजमहालची सुंदरता जपण्यासाठी भारतीय पुरातत्व खातं काम करत आहे. ताजमहालाला या किड्यांपासून वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.(A small insect makes the Taj Mahal green)

भारतीय पुरातत्व खात्याचे सुपरिटेंडेंट डॉक्टर एम. के. भटनागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोल्डी काइरो नोमस नावाचा हा किडा खूप लहान असतो. साध्या डोळ्यांना हे दिसतही नाहीत. ताजमहालाला या किड्यांपासून वाचवण्यासाठी पुरात्तव खात्याकडून सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. पुरातत्व खात्याची केमिकल ब्रँच यासाठी काम करत आहे. जिथे हे किडे बसतात तो भाग धुतला जातो आणि भींती पुसल्या जात असल्याचंही भटनागर यांनी सांगितलं.

छोट्या किड्यांमुळे ताजमहालची सुंदरता धोक्यात

पुरातत्व खात्याच्या म्हणण्यानुसार त्यांचा ठराविक काळ संपल्यानंतर हे किडे आपोआप निघून जातात. ताजमहालच्या सुंदरतेमुळेच दरवर्षी कोट्यवधी पर्यटक या वास्तूला भेट देत असतात. मात्र, हे लहान किडे ताजमहालची सुंदरता बिघडवण्याचं काम करत आहेत.

अमेरिकी एअरफोर्सच्या अधिकाऱ्यांची टीम ताजमहाल पाहायला येणार

दरम्यान कोरोना महामारीचा फटका ताजमहालच्या पर्यटकांवरही पाहायला मिळत आहे. सध्या परिस्थिती काही प्रमाणात आटोक्यात आल्यानंतर ताजमहाल पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची वाढ होत आहे. शनिवारी जवळपास 25 हजार पर्यटकांनी ताजमहालला भेट दिली. तसंच अमेरिकेचे लष्करी अधिकाऱ्यांची एक टीम लवकरच ताजमहाल पाहण्यासाठी येत असल्याची माहिती मिळतेय. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही भारतात आल्यानंतर ताजमहालला भेट दिली होती.

संबंधित बातम्या :

हिमालयातील सुंदर घाटीची सैर करा अवघ्या 11 हजार रुपयांत!

अनलॉक : ताजमहाल प्रदूषणाच्या विळख्यात, प्रदूषित शहरांच्या यादीत आग्रा 9 व्या क्रमांकावर

A small insect makes the Taj Mahal green

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.