Stampede : भोलेबाबांच्या सत्संगात चेंगराचेंगरी, 75 भाविकांचा मृत्यू, काही पायाखाली चिरडले तर काही गुदमरले; भक्तांवर दुःखाचा डोंगर
Satsang Stampede : भोलेबाबांच्या सत्संगात भक्तांवर दुःखाचा डोंगर कोसळला. सत्संगात अचानक चेंगराचेंगरी झाली. या प्रकारात काही भाविक पायाखाली चिरडले गेले. तर काहींचा गुदमरुन मृत्यू झाला. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या चेंगराचेंगरीत 75 भाविकांचा मृत्यू झाला आहे. त्यात 26 महिलांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे.
भोलेबाबाच्या भक्तांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सत्संगात भाविक तल्लीन झाले होते. तेव्हाच अचानक चेंगराचेंगरीला सुरुवात झाली. कोणी पायाखाली चिरडल्या गेले. तर काही जणांचा गुदमरुन मृत्यू झाला. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, या चेंगराचेंगरीत 75 हून अधिक भाविकांचा मृत्यू झाला आहे. त्यात 26 महिलांचा समावेश आहे. तर 150 हून अधिक भक्त गंभीर आहेत. या घटनेने आयोजकांसह भक्तांच्या नातेवाईकांना पण धक्का बसला आहे. यावेळी सरकारी रुग्णालय आणि खासगी रुग्णालयाबाहेर नातेवाईकांच्या आक्रोशाने सर्वांचीच मनं हेलावली.
उत्तर प्रदेश हादरले
उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील फुलरई या गावात हा प्रकार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या गावात भोलेबाबाच्या सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हजारोंच्या संख्येने भाविक पोहचले होते. या कार्यक्रम दरम्यान अचानक चेंगराचेंगरी झाली. यात काही जण पायाखाली आले तर काही जणांचा गुदमरुन मृत्यू झाला. हाती आलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत मयतांचा आकडा 75 वर पोहचला आहे. सार्वजनिक आरोग्य केंद्रात अनेकांना भरती करण्यात आले आहे. तर या दुर्घटनेतील गंभीर भाविकांना जिल्ह्याच्या ठिकाणी उपचारासाठी हलविण्यात आले आहे. मयताचा आकडा वाढण्याची भीती सरकारी रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिले मदतीचे आदेश
या दुर्घटनेने उत्तर प्रदेश हादरले. सरकारी यंत्रणा लागलीच कामाला लागली आहे. गंभीर असलेल्या भाविकांना मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेची माहिती घेतली आहे. मृतांच्या कुटुंबियांविषयी त्यांनी संवेदना व्यक्त केली. याप्रकरणात जिल्हा प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाण्यास सांगण्यात आले आहे. त्यातील काही स्थानिक अधिकारी घटनास्थळी पोहचल्याचे समोर येत आहे. ही घटना नेमकी कशामुळे झाली. चेंगराचेंगरी होण्यामागील कारण काय याचा तपास करण्यात येत आहे. सध्या गंभीर भाविकांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत.
IG शलभ मातूर यांनी या घटनेमागील कारणाचा अंदाज वर्तवला आहे. सत्संग जिथे आयोजीत करण्यात आला होती. ती जागा छोटी होती. तर गर्दी वाढतच गेली. त्यातच अचानक चेंगराचेंगरी झाली. त्यात काहींचा गुदमरुन मृत्यू झाला. मृतांमध्ये महिलांचे प्रमाण अधिक आहे. 26 महिला आणि 2 मुलांचा मृ्तात समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना एटा येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.