टिव्ही मेकॅनिकची मुलगी बनली फायटर पायलट, परिस्थीतिशी दाेन हात करून मिळवले यश

एका टिव्ही मेकॅनिकच्या मुलीने अत्यंत प्रतीकुल परिस्थीतिवर मात करून मिळवलेले हे यश काैतुकास्पद आहे. 

टिव्ही मेकॅनिकची मुलगी बनली फायटर पायलट, परिस्थीतिशी दाेन हात करून मिळवले यश
सानिया मिर्झाImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Dec 23, 2022 | 11:38 AM

मिर्झापूरच,  उत्तर प्रदेशातील मिर्झापूरची मुलगी सानिया मिर्झा हवाई दलात भारताची दुसरी महिला फायटर पायलट (Women Fighter Pilot)   बनणार आहे. सानियाने एनडीए परीक्षेत 148 वा क्रमांक पटकावला आहे. सानिया ही देहत कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जसोवर या छोट्याशा गावात  राहते आहे. सानियाने गुरू नानक गर्ल्स इंटर कॉलेज, मिर्झापूरमधून 12वीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ती यूपी 12वी बोर्डात जिल्हात अव्वल आहे. 10 एप्रिल रोजी तिने एनडीए 2022 ची परीक्षा दिली. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तिने मुलाखतीची तयारी करण्यासाठी अकादमीमध्ये प्रवेश घेतला. वृत्तानुसार, सानिया 27 डिसेंबर 2022 रोजी पुण्यातील खडकवासला एनडीएमध्ये सामील होणार आहे.

सानियाचे वडील टीव्ही मेकॅनिक

व्यवसायाने टीव्ही मेकॅनिक असलेले सानियाचे वडील शाहिद अली म्हणाले, ‘सानिया मिर्झा देशाची पहिली फायटर पायलट अवनी चतुर्वेदीला आपला आदर्श मानते. पहिल्यापासूनच तिला  अनवी सारखं व्हायचं होतं. सानिया ही देशातील दुसरी अशी मुलगी आहे, जिची फायटर पायलट म्हणून निवड झाली आहे.

गावातील प्रत्येक मुलीला दिली प्रेरणा

सानियाची आई तबस्सुम मिर्झा म्हणाली, ‘आमच्या मुलीमूळे आम्हाला आणि संपूर्ण गावाला अभिमान वाटताे आहे. फायटर पायलट होण्याचे स्वप्न पूर्ण करून तिने आपल्या गावातील प्रत्येक मुलीला प्रेरित केले आहे.

हे सुद्धा वाचा

यशाचा खडतर प्रवास

सानिया मिर्झा ही देशातील दुसरी अशी मुलगी आहे, जिची फायटर पायलट म्हणून निवड झाली आहे. सानिया पहिल्यांदा ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकली नाही, त्यामुळे तिने पुन्हा परीक्षा दिली. सानिया म्हणाली की, फायटर पायलट बनणे हे माझे ध्येय होते. सानियाचा प्रेरणास्रोत अवनी चतुर्वेदी ही देशातील पहिली महिला पायलट आहे. पहिल्यापासूनच तिला अवनी सारखं व्हायचं होतं.

विशेष म्हणजे, नॅशनल डिफेन्स अकादमी 2022 च्या परीक्षेत पुरुष आणि महिलांसाठी एकूण 400 जागा होत्या, ज्यामध्ये 19 जागा महिलांसाठी होत्या. त्याच वेळी, यापैकी दोन जागा लढाऊ वैमानिकांसाठी राखीव होत्या. या दोनपैकी एक जागा सानिया मिर्झाने मिळवली आहे. एका टिव्ही मेकॅनिकच्या मुलीने अत्यंत प्रतीकुल परिस्थीतिवर मात करून मिळवलेले हे यश काैतुकास्पद आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.