Video : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींच्या खिशातून जेव्हा चिमुकला पेन पळवतो! पाहा मुख्यमंत्र्यांनी काय केलं?
ते बाळ सतत जगन मोहन रेड्डी यांच्या खिशातील पेन काढण्यासाठी प्रयत्न करतो. शेवटी मुख्यमंत्र्यांच्या खिशातील पेन खाली पडतो. त्यानंतर जगन मोहन रेड्डी आपला पेन त्या बाळाला देऊन टाकतात. तेव्हा त्या बाळाच्या आईचे भाव पाहण्यासारखे होते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांना जनतेचा मुख्यमंत्री असं संबोधलं जातं. त्यांची लोकप्रियता अफाट आहे. जनतेसाठी ते सदैव तत्पर असतात. सध्या आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh) पूरस्थिती आहे. शेतीसह अनेक भागात घरांचंही मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर जगन मोहन रेड्डी राज्याचा दौरा करत आहेत. या दौऱ्यातील त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की मुख्यमंत्र्यांनी एका लहान बाळाला कवेत घेतलेलं आहे आणि ते जनतेशी संवाद साधत आहेत. तेव्हा ते बाळ सतत जगन मोहन रेड्डी यांच्या खिशातील पेन काढण्यासाठी प्रयत्न करतो. शेवटी मुख्यमंत्र्यांच्या खिशातील पेन खाली पडतो. त्यानंतर जगन मोहन रेड्डी आपला पेन त्या बाळाला देऊन टाकतात. तेव्हा त्या बाळाच्या आईचे भाव पाहण्यासारखे होते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जगन मोहन रेड्डी पूरग्रस्त भागात परिस्थितीची पाहणी करत होते. त्यावेळी ते जनतेच्या समस्या जाणून घेत होते. त्यावेळी त्यांनी एका बाळाला कवेत घेतलं होतं. शेवटी बाळ ते बाळ… आपण मुख्यमंत्र्यांच्या कवेत आहोत हे त्या बाळाला काय माहिती. मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या खिशातील पेन घेण्याचा प्रयत्न ते बाळ करत असतं. मात्र, बराच वेळ त्याला तो घेता येत नाही. शेवटी पेन मिळवण्याच्या प्रयत्नात तो खाली पडतो. त्यानंतर आई आपल्या बाळाला मुख्यमंत्र्यांच्या कवेतून घेते. मुख्यमंत्री पडलेला पेन घेतात आणि तो बाळाच्या हाती देतात. लगेच ते बाळही पेन तोंडात घालतं. तेव्हा त्या आईला नेमकं काय करावं सूचत नाही. मात्र, मुख्यमंत्री त्या आईच्याही डोक्यावर हात ठेवून पुढील पाहणीसाठी निघतात.
Video of the Day ?
आंध्र प्रदेश के मुख्यमंत्री जगह मोहन रेड्डी @ysjagan बाढ़ग्रस्त इलाकों के दौरे पर थे और एक छोटे से बच्चे ने इस दौरान उनकी जेब से पेन निकालने की कोशिश की। उसके बाद क्या हुआ आप खुद देखिये। pic.twitter.com/J9e0uxi7Pj
— Shivangi Thakur (@thakur_shivangi) July 26, 2022
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर जगन मोहन रेड्डी यांना लोक सलाम करत आहेत. एका यूजरने कमेंटमध्ये म्हटलंय की खरंच हा जनतेचा मुख्यमंत्री आहे. तर काही जण म्हणत आहेत की, लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात हे खरंच आहे.