अशी वेळ कुणावरच येवू नये! महिलेने एकाच वेळी दिला पाच मुलांना जन्म दिला पण…
राजस्थानमध्ये एका महिलेने एकावेळी चक्क पाच मुलांना जन्म दिला. लग्नानंतर सात वर्षानंतर ही महिला गरोदर राहिली होती. लग्नानंतर अनेक वर्षांनी घरात लहान मुलांचे आगमन होणार होते. तब्बल सात वर्षांनी या महिलेला आई होण्याचे सुख मिळणार होते. त्यामुळे तिच्या कुटुंबातील सर्वच सदस्य आनंदात होते. मात्र, या महिलेची प्रसुती झाली आणि काही क्षणात हे वातावरण दु:खात बदलेले गेले.
जयपूर : मातृत्व हे प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील सुखाचा क्षण असतो. आई होण्यासाठी महिला अनेक प्रयत्न करतात. गर्भवती राहिल्यांनतर बाळ सुखरुप बाहेर येई पर्यंत माता अनेक कष्ट घेतात. मात्र, राजस्थानमध्ये(Rajasthan) एका मातेहस अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. लग्नाच्या सात वर्षानंतर ही महिला गर्भवती राहिली. या महिलेने एका वेळी दिला पाच मुलांना जन्म दिला पण तिचे एकही मुल वाचले नाही. या घटनेमुळे महिलेवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. ही महिला पूर्णपणे खचून गेले आहे. या महिलेच्या बाळाला वाचवण्याचे डॉक्टरांचे प्रयत्न अपयशी ठरले आहेत.
राजस्थानमध्ये एका महिलेने एकावेळी चक्क पाच मुलांना जन्म दिला. लग्नानंतर सात वर्षानंतर ही महिला गरोदर राहिली होती. लग्नानंतर अनेक वर्षांनी घरात लहान मुलांचे आगमन होणार होते. तब्बल सात वर्षांनी या महिलेला आई होण्याचे सुख मिळणार होते. त्यामुळे तिच्या कुटुंबातील सर्वच सदस्य आनंदात होते. मात्र, या महिलेची प्रसुती झाली आणि काही क्षणात हे वातावरण दु:खात बदलेले गेले.
रेशमा असे या महिलेचे नाव आहे. रेशमा मासलपुर क्षेत्रातील पिपरानी गावात राहणारी आहे. सोमवारी सकाळी तिने एकावेळी पाच मुलांना जन्म दिला होता. या महिलेची वेळेआधीच म्हणजेच सात महिन्यातच प्रसुती झाली होती. त्यामुळे प्रसुतीनंतर तिची पाचही मुले अत्यंत नाजूक जन्माला आली होती.
डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे पाच मुलांच्या जन्माच्या वेळेत एक ते दीड मिनिटांचे अंतर होते. पाचही मुलांचे वजन 300 ते 600 ग्राम होते. महिलेने 2 मुले आणि तीन मुलींना जन्म दिला होता. यातील 2 मुले आणि दोन मुलींचा उपचारासाठी जयपुरच्या रुग्णालयात नेताना रस्त्यातच मृत्यू झाला. तर उरलेल्या एका मुलीने जयपुरच्या रग्णालयात पोहोचल्यावर अखेरचा श्वास सोडला.
पहिल्यांदाच गर्भधारणेनंतर या महिलेने एका वेळी पाच मुलांना जन्म दिला होता. मात्र दुर्दैवाने यातील एकाही मुलाचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश मिळाले नाही. या दुखद घटनेनंतर महिलेबाबत सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, प्रसुतीदरम्यान लाखो महिलांमधून एकाच्या बाबतीत अशी घटना घडते.