एक चूक तरुणाला नडली, जे काही घडलं त्याने सर्वच हादरले; गोव्याची ट्रीप जिवावर बेतली
गोव्याला गेलेला तरुण पणजी येथे एका ठिकाणी कार उभी करुन गाडीत बसला होता. अचानक गाडी सुरु झाली आणि तीन वाहनांना धडकली.
पणजी : गोव्याला फिरायला गेलेल्या नवी मुंबईतील तरुणाचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पणजी येथे घडली आहे. सुजय सुरलाकर असे 33 वर्षीय मयत तरुणाचे नाव आहे. सुजयच्या कारने तीन वाहनांना धडक दिल्यानंतर कारने पेट घेतला. यात चारही गाड्या जळून खाक झाल्या. कारसह सुजयही होरपळला. याच सुजयचा जागीच मृत्यू झाला. कारमधील पाकिटात सापडलेल्या त्याच्या मतदार कार्डावरून मृतदेहाची ओळख पटली. मृतदेह गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. पीडितेचे कुटुंब गोव्यात आल्यानंतर मृत्यूचे कारण शोधण्यासाठी शवविच्छेदन केले जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
कार रस्त्यावर उभी करुन आत बसला होता
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजय सुमारे दोन तास पणजीतील टोंका येथे गुरुवारी पहाटे कार उभी करुन होता. यावेळी गाडीचे इंजिन सुरुत होते. नकळतपणे सुजयचा पाय एक्सिलेटरवर पडल्याने कार सुस्साट जाऊन घटनास्थळी पार्क असलेल्या अन्य तीन कारला धडकली. धडक देताच गाडीने पेट घेतला. यावेळी कारसोबत अन्य तीन गाड्याही पेटल्या. यात कारमधील सुजयचा होरपळून मृत्यू झाला. ही सर्व घटना तेथील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
अग्नीशमन दलाने तात्काळ धाव घेत आग विझवली पण…
एका सुरक्षा रक्षकाने तात्काळ पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवांना सूचित केले. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, त्यांनी आग विझवली तोपर्यंत सुजयचा मृत्यू झाला होता. पीडित तरुणी मीरामार येथून पणजीतील कामभाटकडे जात असावा, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पणजी पोलीस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यू आणि अपघाताची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.