मुख्यमंत्रीजी, तुम्ही दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांसोबत असायला हवं, आपच्या खासदाराचा सवाल
आम आदमी पक्षाचे खासदार भगवंत मान यांनी शेतकरी आंदोलनावरुन पंजाबच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. Bhagwant Man Captain Amarinder Singh
नवी दिल्ली: आम आदमी पक्षाचे खासदार भगवंत मान यांनी शेतकरी आंदोलनावरुन पंजाबच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंह यांनी दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांसोबत असायला हवं, असं भगंवत मान म्हाले आहेत. दिल्लीच्या सीमांवर पोलिसांनी बॅरिकेटींग केले आहे. शेतकऱ्यांना रोखण्याचा हा प्रयत्न एखाद्या दुश्मन सैन्याला रोखण्यासारखा असल्याचं भगवंत मान म्हणाले. आपच्या खासदारांनी कॅप्टन अमरिंदर सिंह यांना तुम्ही मुख्यमंत्री आहात तुम्ही शेतकऱ्यांसह दिल्लीच्या सीमांवर असायला हवं, असं म्हटलंय. मात्र, तुम्ही शेतकऱ्यांसोबत नाही, अशी टीका मान यांनी अमरिंदरसिंह यांच्यावर केलीय. (AAP MP Bhagwant Man slams Punjab CM Captain Amarinder Singh over Farmer Protest)
कॅप्टन अमरिंदरसिंह यांनी आंदोलक शेतकऱ्यांसाठी हेल्प डेस्क सेवा सुरु करायला हवी होती. ती देखील सुरु करण्यात आलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी आंदोलक शेतकऱ्यांसह दिल्लींच्या सीमांवर असायल हवं होतं. भगवंत मान यांनी यावेळी अमरिंदरसिंह यांचं कुटुंब अडचणीत असतं तेव्हा ते गृहमंत्र्यांना पत्र लिहीतात. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते अमित शाह यांना भेटत नाहीत, असं टीकास्त्र भगवंत मान यांनी सोडलेय.
भगवंत मान यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
Police have put nail barricades as if it was some rival army that they had to stop. Captain Amarinder Singh, you are the CM, you should be on the Delhi borders with farmers. Why don’t you arrange a helpdesk for them and join them at the camps?: Bhagwant Mann, AAP MP from Punjab pic.twitter.com/BthfHohmu7
— ANI (@ANI) February 2, 2021
शेतकरी संकटात असतना कॅप्टन अमरिंदरसिंह यांनी गृहमंत्री अमित शाह यांना भेटायला हवं होतं. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याचं आश्वासन दिलं होत. ते आश्वासन कधी पूर्ण करणार असा सवाल भगवंत मान यांनी केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारणाच्या बाहेर पडून सर्वांनी आंदोलनाला समर्थन दिलं पाहिजे, असंही भंगवंत मान म्हणाले.
दरम्यान, दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश राज्यातील शेतकरी कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. दिल्लीच्या सीमांवरील आंदोलनाला दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावाधी झाला असून शेतकरी अद्याप आंदोलनावर ठाम आहेत. शेतकऱ्यांनी कृषी कायदे मागे घेण्याची मागणी केली आहे. किमान आधारभूत किंमतीवर कायदा बनवला जावा, अशी मागणी देखील आंदोलक शेतकऱ्यांची आहे. तर, केंद्र सरकार कृषी कायद्यांवर ठाम आहे. केंद्र सरकारनं कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी बनवण्यात आल्याचं म्हटलं आहे.केंद्राकडून कृषी कायद्यांना क्रांतिकारी म्हटलं गेलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या अभिभाषणात कृषी कायद्याचा 10 कोटी छोट्या शेतकऱ्यांना लाभ झाल्याचं सांगितलं होतं.
संबंधित बातम्या :
पंजाबमध्ये तुफान राडा, वीटा आणि दगडांचा मारा, आकाली दलाच्या अध्यक्षांच्या गाडीवर हल्ला
या देशात लोकशाही जिवंत आहे का?; शिवसेनेचा संताप; शेतकरी आंदोलकांशी चर्चा
AAP MP Bhagwant Man slams Punjab CM Captain Amarinder Singh over Farmer Protest