AAP ला अमेरिका, कॅनडा, अरब देशातून मिळाली कोट्यवधीची माया, ED चा गृहमंत्रालयाला धक्कादायक अहवाल

अमेरिका आणि कॅनडात निधी उभारण्याच्या मोहीमेत केवळ पैसे गोळा केले नाहीत तर परदेशी पैशांवर FCRA नूसार असलेल्या प्रतिबंधापासून वाचण्यासाठी बुक ऑफ अकाऊंटमध्ये वास्तविक दातृत्वदात्यांची ओळख लपविली आहे.

AAP ला अमेरिका, कॅनडा, अरब देशातून मिळाली कोट्यवधीची माया, ED चा गृहमंत्रालयाला धक्कादायक अहवाल
kejariwal delhi cmImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: May 20, 2024 | 6:31 PM

दिल्ली मद्य घोटाळ्यात ईडीच्या तावडीत अडकलेल्या आम आदमी पक्षाच्या अडचणी संपण्याचे नावच घेत नाहीएत. आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना ईडीने परदेशातून फंड मिळत असल्याचा सनसनाटी आरोप केला होता. आम आदमी पार्टीला 2014-2022 दरम्यान 7.08 कोटी रुपयांचा विदेशी फंड मिळाल्याचा आरोप ईडीने गृहमंत्रालयाला पाठविलेल्या अहवाल केला आहे. तपास पथकाने परदेशी निधी मिळविण्यासाठी आप पक्षाने भारतीय दंड संहिता ( आयपीसी ), लोकप्रतिनिधी अधिनियम ( आरपीए ) आणि विदेश अंशदान विनियमन अधिनियम ( एफसीआए ) चे उल्लंघन केल्याचा आरोप आपवर झाला आहे. या निधी कसाही करुन मिळविण्यासाठी विदेशी दानकरणाऱ्यांची ओळख आणि नारिकत्व आणि अन्य बाबी लपविण्याचे गुन्हा केल्याचा आरोप ईडीने चार्जशिटमध्ये केला आहे.

आम आदमी पार्टीला कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कुवेत, ओमान आणि इतर आखाती देशांमधून अनेक देणगीदारांकडून पैसे मिळाले आहेत. सारख्या क्रमांकाचे पासपोर्ट, क्रेडिट कार्ड, ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक वेगवेगळ्या देणगीदारांनी निधी हस्तांतरित करण्यासाठी वापरल्याचा आरोप ( ईडी ) सक्तवसुली संचनालयाने केला आहे. ऐन निवडणूकीच्या तोंडावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली होती. सध्या केजरीवाल यांना न्यायालयाने 1 जूनपर्यंत अंतरिम जामिन मंजूर केला आहे.

वैयक्तिक फायद्यासाठी वापर

आप आणि त्यांच्या नेत्यांनी परदेशातून निधी उभारताना अनेक अनियमितेची प्रकरणे केल्याचे ईडीचे म्हणणे आहे. आम आदमी पक्षाचे आमदार दुर्गेश पाठक यांच्यासह अनेक नेत्यांवर 2016 मध्ये कॅनडातील निधी उभारणी कार्यक्रमातून मिळालेल्या पैशाचा वैयक्तिक फायद्यासाठी गैरवापर केल्याचा आरोप ईडीने केला आहे. तसेच, अनिकेत सक्सेना ( आप ओव्हरसीज इंडियाचे समन्वयक ), कुमार विश्वास ( आप ओव्हरसीज इंडियाचे तत्कालीन संयोजक ), कपिल भारद्वाज ( आप सदस्य ) यांच्यासह विविध आप स्वयंसेवक आणि पाठक यांच्या सह अन्य पदाधिकाऱ्यांना पाठवलेल्या ई-मेलच्या आधारे ईडीने हे आरोप केले आहेत.

Non Stop LIVE Update
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.