EPFO : आता हेच कमी होते, पीएफवरील व्याज कमी होण्याची भीती

EPFO : नोकरदारांना भविष्यात एक वाईट बातमी मिळू शकते. पीएफवरील व्याज दर कमी होऊ शकते. इतकी कपात होण्याची शक्यता आहे.

EPFO : आता हेच कमी होते, पीएफवरील व्याज कमी होण्याची भीती
Follow us
| Updated on: Sep 17, 2023 | 4:33 PM

नवी दिल्ली | 17 सप्टेंबर 2023 : देशातील नोकरदारांना नजीकच्या काळात एक वाईट बातमी मिळू शकते. त्यांच्या सणाच्या उत्साहावर पाणी फेरु शकते. येत्या काळात पीएफवरील व्याजदरात कपात होऊ शकते. केंद्रीय भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) पीएफवरील व्याजदरात ( PF Interest) वाढीचा निर्णय घेतलेला आहे. पण ही रक्कम अद्यापही खात्यात जमा झाली नसल्याचा आरोप कर्मचारी करत आहेत. अनेक युझर्सनी जाहीर नाराजी व्यक्त केली. तर काहींनी व्याजाची रक्कम सोडा देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांचा पीएफमधील मुळ पैसा तरी सुरक्षित आहे का असा जहरी सवाल विचारला होता. कारण सरकार पीएफमधील गुंतवणूक आता शेअर बाजारात वळविण्याच्या विचारात आहे. त्यातच पीएफवरील व्याज दरात कपातीची वाईट बातमी येऊन धडकली आहे.

ईपीएफओला झाला तोटा

इंडियन एक्सप्रेसच्या एका वृत्तानुसार, आरटीआय आधारे ही माहिती समोर आली आहे. त्यानुसार, आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये ईपीएफओला लाभ होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. पण झालं उलटंच, तोटा झाला. दाव्यानुसार, ईपीएफओकडे 449.34 कोटी रुपये सरप्लस राहतील, असा अंदाज होता. पण ईपीएफओला 197.72 कोटी रुपयांचा फटका बसला. त्याचा परिणाम आता व्याजदरावर होण्याची भीती आहे.

हे सुद्धा वाचा

सध्या किती व्याजदर निश्चित

सध्या पीएफवरील व्याजदर कमी मिळत आहे. ईपीएफओने आर्थिक वर्ष 2022-23 साठी पीएफवरील व्याजदर 8.15 टक्के निश्चित केला आहे. अर्थ मंत्रालयानुसार, ईपीएफओला बसलेला फटका पाहता पीएफवरील व्याज दराचा पुनर्विचार होऊ शकतो. पीएफवरील उच्च व्याज दर कमी करण्याची शक्यता आहे.

या योजनेत पीएफपेक्षा जास्त व्याज

पीएफवरील व्याजदराचा इतर बचत योजनांवरील व्याजदराशी तुलना करण्यात आली. अल्पबचत योजनांमध्ये ज्येष्ठ नागरिक बचत योजनांवर सर्वाधिक व्याज मिळते. या योजनेवर 8.20 टक्के व्याज देण्यात येते. सुकन्या समृद्धी योजनेपासून ते राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रासह इतर सर्व योजनांवरील व्याजदर कमी आहे. केंद्रीय अर्थमंत्रालय गेल्या अनेक वर्षांपासून पीएफवरील व्याजदर 8 टक्क्यांपेक्षा कमी असावे, यासाठी वकीली करत आहे.

व्याजदरात घसरण

  • 2019-20 साठी प्रॉव्हिडंट फंड ठेवींवरील व्याज दर 8.5 टक्क्यांवर आणला.
  • 2018-19 मध्ये ईपीएफओवर 8.65 टक्के व्याज देण्यात आले होते.
  • ईपीएफओने 2016-17  आणि 2017-18 मध्ये 8.65 टक्के व्याजही दिले होते.
  • 2015-16 मध्ये हा व्याजदर 8.8 टक्के होता.
  • त्याचबरोबर 2013-14 मध्ये 8.75 टक्के व्याज
  • 2014-15 मध्ये 8.75 टक्के व्याज देण्यात आले होते.
  • 2012-13 मध्ये हा व्याजदर 8.5 टक्के होता.
  • 2011-12 मध्ये हे प्रमाण 8.25 टक्के होते.
  • आर्थिक वर्ष 2020-21 साठी 24 कोटी पीएफ खात्यांमध्ये 8.5 टक्क्यांनी व्याज जमा
  • त्यानंतर व्याजदरात अजून कपात करत तो 8.1 टक्क्यांवर आला होता.
Non Stop LIVE Update
अजित दादांच्या पत्नीनं लाटल्या वारक-यांसाठी चपात्या, बघा व्हिडीओ
अजित दादांच्या पत्नीनं लाटल्या वारक-यांसाठी चपात्या, बघा व्हिडीओ.
ठाकरेंचा लाडकी बहीणवरून निशाणा, खोतकरांच्या त्या व्हिडीओचा दिला दाखला
ठाकरेंचा लाडकी बहीणवरून निशाणा, खोतकरांच्या त्या व्हिडीओचा दिला दाखला.
आपले 7-8 मुख्यमंत्री होऊ द्या, त्यात मुस्लिम..,जरांगेंचा सरकारला इशारा
आपले 7-8 मुख्यमंत्री होऊ द्या, त्यात मुस्लिम..,जरांगेंचा सरकारला इशारा.
विधानसभा-लोकसभेत पाठिंबा देणार, आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाकरे म्हणाले.
विधानसभा-लोकसभेत पाठिंबा देणार, आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाकरे म्हणाले..
'लाडकी बहीण'वरून उद्धव ठाकरेंचा पहिल्यांदाच बोलले, घरातील बहीण-भावात..
'लाडकी बहीण'वरून उद्धव ठाकरेंचा पहिल्यांदाच बोलले, घरातील बहीण-भावात...
कोकणरेल्वेचा खोळंबा; रूळावर पाणी,एक्स्प्रेस अडकल्या, प्रवाशांची पायपीट
कोकणरेल्वेचा खोळंबा; रूळावर पाणी,एक्स्प्रेस अडकल्या, प्रवाशांची पायपीट.
पनवेलच्या पडघे गावाला पुराचा वेढा, साचलं गुडघाभर पाणी अन् वाहनं गेली..
पनवेलच्या पडघे गावाला पुराचा वेढा, साचलं गुडघाभर पाणी अन् वाहनं गेली...
मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका, वडेट्टीवार काय म्हणाले?
मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका, वडेट्टीवार काय म्हणाले?.
मुख्यमंत्री शिंदेंच्या दरे गावची वाहतूक पूर्णपणे बंद, नेमकं कारण काय?
मुख्यमंत्री शिंदेंच्या दरे गावची वाहतूक पूर्णपणे बंद, नेमकं कारण काय?.
राज्यात मध्यरात्रीपासूनच संततधार, तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?
राज्यात मध्यरात्रीपासूनच संततधार, तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?.