जीवाजी विद्यापीठ परिसरात शिक्षक आणि कर्मचारी पाहत होते पॉर्न, 2 महिलांचाही समावेश!

जिवाजी विद्यापीठात एक धक्कादायक बाब समोर आलीय. या विद्यापीठ परिसरात शिक्षक आणि कर्मचारी यांच्यासह एकूण 8 जण पॉर्न फिल्म पाहत असल्याचं समोर आलंय.

जीवाजी विद्यापीठ परिसरात शिक्षक आणि कर्मचारी पाहत होते पॉर्न, 2 महिलांचाही समावेश!
Follow us
| Updated on: Mar 25, 2021 | 2:30 PM

भोपाळ : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरच्या जिवाजी विद्यापीठात एक धक्कादायक बाब समोर आलीय. या विद्यापीठ परिसरात शिक्षक आणि कर्मचारी यांच्यासह एकूण 8 जण पॉर्न फिल्म पाहत असल्याचं समोर आलंय. या 8 जणांपैकी 2 महिला आहेत, तर एक 58 वर्षाचा वृद्ध व्यक्ती आहे. या प्रकाराची माहिती सर्वत्र पसरल्यानंतर विद्यापीठात एकच खळबळ माजली आहे. विद्यापीठाची प्रतिमा यामुळे मलिन होत असल्यामुळे विद्यापीठाने 2 महिलांसह 4 जणांवर निलंबनाची कारवाई केली आहे. यात पर्मनंट असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही.(Action against staff and teachers watching porn movies at Jiwaji University premises)

नॅशनल नॉलेज नेटवर्ककडून प्रकार उघडकीस

जीवाजी विद्यापीठातील हा सर्व प्रकार नॅशनल नॉलेज नेटवर्कने उघडकीस आणलाय. NKNने विद्यापीठ प्रशासनाला माहिती दिली की त्यांच्या विद्यापीठात 8 यूजर आयडीवरुन 2 दिवसांत जवळपास 21 तास पॉर्न वेबसाईट सर्च करण्यात आली आहे. प्रत्येक दिवसाचा हिशेब काढल्यास दिवसाला 179 मिनिटे फक्त वेबसाईट सर्च केल्या गेल्या नाही तर त्यावर थांबून कंटेन्टही पाहिला गेला आहे. इतकच नाही तर या कर्मचाऱ्यांनी आपल्या फोन मध्ये पॉर्न फिल्म्सही डाऊनलोड केल्याची माहिती NKN ने दिली आहे. या प्रकरानंतर जीवाजी विद्यापीठात एकच हलकल्लोळ माजलाय.

निवृत्तीला आलेल्या कर्मचाऱ्यांचाही सहभाग!

विद्यापीठ परिसरात पॉर्न फिल्म पाहणाऱ्या 8 कर्मचारी आणि शिक्षकांमध्ये 2 व्यक्ती असेही आहेत, ज्यांचं वय 58 वर्षाच्या जवळपास आहे. ते आता निवृत्तीला आले आहेत. विद्यापीठ प्रशासनाने या सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसला उत्तर देताना काही कर्मचाऱ्यांनी आपण अन्य वेबसाईट सर्च करत होतो, तेव्हा अचानक पॉर्न वेबसाईट आपोआप ओपन झाल्या असं सांगितलं आहे. या प्रकारच्या वेबसाईट सर्च करणाऱ्यांमध्ये 2 महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

विद्यापीठ प्रशासनाकडून कारवाई

या प्रकरानंतर विद्यापीठ प्रशासनाने कठोर पाऊल उचललं आहे. विद्यापीठाने सर्व्हिस प्रोव्हायडरचे 4 कर्मचारी कपिल सेन, अनुराग शर्मा आणि दोन महिलांना कामावरुन काढून टाकलं आहे. तर फॅकल्टी टिचर हीरेंद्र यांना कम्प्यूटर सायन्स डिपार्टमेंटमधून हटवलं आहे. तर स्थायी कर्मचारी रिशेष रजक याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

इतर बातम्या :

आरएसएसला ‘संघ परिवार’ म्हणणार नाही; राहुल गांधींनी दिलं ‘हे’ कारण!

आसामहून तेलंगणात सोने तस्करी, 24 किलो सोन्याच्या विटा जप्त, कोट्यावधींचं घबाड लपवण्याची शक्कल पाहून पोलीसही अवाक

Action against staff and teachers watching porn movies at Jiwaji University premises

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.