Khushbu Sundar | भाजप नेत्या-अभिनेत्री खुशबू सुंदर कार अपघातातून बालंबाल बचावल्या

कंटेनरची धडक झाल्याने भाजप नेत्या खुशबू सुंदर यांच्या गाडीला तामिळनाडूत भीषण अपघात झाला

Khushbu Sundar | भाजप नेत्या-अभिनेत्री खुशबू सुंदर कार अपघातातून बालंबाल बचावल्या
Follow us
| Updated on: Nov 18, 2020 | 2:39 PM

चेन्नई : राजकीय आखाड्यात उतरलेल्या प्रख्यात अभिनेत्री खुशबू सुंदर (Khushbu Sundar) यांना तामिळनाडूत अपघात झाला. सुदैवाने खुशबू या कार अपघातातून बालंबाल बचावल्या आहेत. गेल्याच महिन्यात खुशबू यांनी भाजपचा झेंडा हाती धरला आहे. (Actor turned politician Khushbu Sundar Met with an accident in Tamilnadu)

कंटेनरला धडकून खुशबू सुंदर यांच्या गाडीला अपघात झाला होता. खुशबू यांनी ट्विटरवर अपघातग्रस्त गाडीचे फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये खुशबू यांच्या गाडीच्या एका भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाल्याचं दिसत आहे.

“मेलमर्वथुरजवळ मला अपघात झाला. एका टँकरने आमच्या कारला धडक दिली. तुमच्या प्रार्थना आणि देवाच्या दयेने मी सुखरुप आहे.” असं खुशबू यांनी लिहिलं आहे.

“मी वेत्री वेल यात्रेत (Vetri Vel Yatra) सहभागी होण्यासाठी कडलोरला जात आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. भगवान मुरुगन यांनी आम्हाला वाचवले. माझ्या पतीच्या श्रद्धेचा प्रत्यय पुन्हा आला” असेही खुशबू यांनी ट्विटरवर लिहिले आहे.

रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी खुशबू सुंदर यांच्या कारचालकासह कंटेनर चालकालाही अटक करण्यात आली आहे. वॉशिंग मशिनने भरलेल्या कंटेनरला ओव्हरटेक करताना खुशबू यांची गाडी कंटेनरला चाटून गेल्याचं पोलिसांनी सांगितलं.

खुशबू यांनी मात्र पुन्हा ट्विट करत कंटेनरनेच आपल्या गाडीला धडक दिल्याचा पुनरुच्चार केला आहे. पोलीस घातपाताची शक्यता पडताळून पाहत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

(Actor turned politician Khushbu Sundar Met with an accident in Tamilnadu)

कोण आहेत खुशबू सुंदर?

खुशबू सुंदर यांनी मेरी जंग, जानू, तन बदन, दिवाना मुझसा नही अशा मोजक्या बॉलिवूडपटांमध्ये काम केलं आहे. मेरी जंग सिनेमात जावेद जाफ्रीसोबत ‘बोल बेबी बोल’ या गाण्यात त्या झळकल्या होत्या. खुशबू यांनी प्रामुख्याने तामिळ चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत, तसेच कन्नड, तेलुगू, मल्ल्याळम सिनेमातही त्यांनी काम केलं आहे.

2010 मध्ये खुशबू यांनी राजकीय इनिंग सुरु केली. करुणानिधींच्या उपस्थितीत त्यांनी द्रमुकमध्ये प्रवेश केला. मात्र चार वर्षांतच त्यांनी पक्षाला रामराम ठोकला. 2014 मध्ये खुशबू यांनी काँग्रेसचा झेंडा हाती धरला. त्या काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या होत्या. गेल्याच महिन्यात खुशबू यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. पुढील वर्षी होणाऱ्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपसाठी हा मोठा दिलासा मानला जातो.

संबंधित बातम्या :

काँग्रेसला घरचा आहेर देऊन भाजपमध्ये प्रवेश; कोण आहेत अभिनेत्री खुशबू सुंदर?

(Actor turned politician Khushbu Sundar Met with an accident in Tamilnadu)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.