Sunny Leone : सनी लिओनीला मिळतोय सरकारी योजनेचा लाभ ? खात्यात दर महिन्याला 1000 रुपये जमा, काय आहे प्रकरण ?
Mahtari Vandan Yojana : 2024 साली छत्तीसगड सरकारने महतारी वंदन योजना सुरू केली होती. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या विवाहीत महिलांना दरमहा 1000 रुपये मदत देणे हे त्या योजनेचे उद्दिष्ट. दर महिन्याला 1,000 रुपयांची मदत रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली जाते.
बॉलिवूडमधील अभिनेत्री आणि सनी लिओनी ही नेहमी चर्चेत असते. सध्या ती कोणत्याही चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये तर कधी एअरपोर्टवर स्पॉट झाल्यानंतर सनी लिओनीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता हीच सनी लिओनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, मात्र ती तिच्या कामामुळे किंवा फोटोंमुळे नव्हे तर वेगळ्याच कारणामुळे. ते ऐकून तुम्हीदेखील हैराण व्हाल. एका सरकारी योजनेचा लाभ घेतल्याने सनी लिओनीचं नाव चर्चेत आल आहे. छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या नेत्याच्या कुटुंबातील तीन महिलाच नव्हे तर अभिनेत्री सनी लिओनी ही देखील महतारी वंदन योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आलं आहे. छत्तीसगड सरकारच्या महतारी वंदन योजनेअंतर्गत लाभार्थी म्हणून सनी लिओनी हिला पैसे पाठवण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे.
चित्रपट अभिनेत्री असलेल सनी लिओनी दरमहा लाखो रुपये खर्च करत असेल मग तिला ‘महतारी वंदन योजने’चे 1000 रुपये घेण्याची गरज का भासली असावी ? असा प्रश्न सध्या सगळ्यांच्याच मनात आहे. चला जाणून घेऊया की हे नेमकं प्रकरण आहे तरी काय ?
मिळालेल्या माहितीनुसार,अभिनेत्री सनी लिओनी हिच्या नावाने ऑनलाईन अकाऊंट उघडण्यात आलं. महतारी वंदन योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या कमकुवत विवाहीत महिलांना दर महिन्याला 1 हजार रुपये देण्यात येतात. 2024 मध्ये सत्ताधारी भाजपने निवडणूक प्रचारादरम्यान ही घोषणा केली होती. याच योजनेअंतर्गतचे पैसे सनी लिओनीच्या नावावरील अकाऊंटमध्ये कथितरित्या पाठवण्यात येत असल्याचे समोर आल्याने खळबळ माजली.
ही बाब निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकारी हरिस एस यांनी महिला व बालविकास विभागाच्या जिल्हा अधिकाऱ्यांना ‘महतरी वंदन योजने’च्या तलूर गावातील गैरप्रकारांची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच संबंधित व्यक्तीचे बँक खाते जप्त करून वसुलीची कारवाई करण्याचीही सूचना देण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर या कामात सहभागी असलेल्या कामगार व व्यक्तीवर एफआयआर नोंदवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. महिला व बालविकास विभागाने संबंधितांवर आवश्यक कारवाई केली.
अधिकाऱ्यांनी काय सांगितलं ?
सनी लिओनी हिला ‘महतारी वंदन योजने’अंतर्गत 1000 रुपये मिळत असल्याची तक्रार आली होती, असे जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांनी सांगितलं. वेबसाईटवर तपासणी केली असता संबंधीत फाइलमध्ये लाभार्थी व्यक्तीचे नाव सनी लिओनी आणि तिच्या पतीचे नाव जॉनी सिन्स दाखवण्यात आले आहे. याचा प्राथमिक तपास केला असता बस्तर जिल्ह्यातील तलूर सेक्टरमधील अंगणवाडी स्तरावर हा अर्ज करण्यात आला होता असे समोर आले. सदर अर्ज तालूर गावातील अंगणवाडी सेविकेच्या ओळखपत्रावर नोंदवण्यात आल्याचेही उघड झालं. वीरेंद्र जोशी नावाच्या व्यक्तीने फसवणूक करून त्यांच्या खात्यातून बेकायदेशीरपणे रक्कम काढल्याचे चौकशीतून निष्पन्न झालं.
सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी आता वीरेंद्र जोशी याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तसेच त्याचे बँक अकाऊंटही होल्ड ( रोखण्यात) करण्यात आलं असून वसूलीची कारवाई करण्यात येत असल्याचे समजते. तसेच संबंधित कामगार आणि तत्कालीन पर्यवेक्षकावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणारे आहे.
महतारी वंदन योजना
छत्तीसगड सरकारने 2024 महतारी वंदन योजना मध्ये सुरू केली होती. आर्थिकदृष्ट्या कमकुवत विवाहित महिलांना दरमहा 1,000 रुपयांची मदत देणे हे त्या योजनेचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक महिन्याला 1,000 रुपयांची मदत रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक अकाऊंटमध्ये ट्रान्स्फर केली जाते. छत्तीसगडमधील रहिवासी असलेल्या, 21 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या तसेच दारिद्र्यरेषेखाली असणाऱ्या आणि ज्या महिल्याच्या कुटुंबातील एकही व्यक्ती सरकारी नोकरीत नाही, अशा महिलांनाच या योजनेचा लाभ मिळतो.