Viral News : पेन्शनसाठी नवऱ्याला मारला, 12 महिलांनी विधवा असल्याचं सांगून…

Trending News : काही अतिहुशार महिलांनी सरकारी योजनेचा फायदा घेण्यासाठी आपल्या नवऱ्याचा मृत्यू झाल्याची कागदपत्र दिली आहे. ज्यावेळी अधिकाऱ्यांनी क्रॉस तपासणी केली त्यावेळी त्यांना सुध्दा धक्का बसला आहे.

Viral News : पेन्शनसाठी नवऱ्याला मारला, 12 महिलांनी विधवा असल्याचं सांगून...
Government schemeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 15, 2023 | 4:44 PM

नवी दिल्ली : सरकारी योजनेचा फायदा (Government scheme) घेण्यासाठी लोकं काय करतील याचा नेम नाही. काही अतिहुशार महिलांनी आपली चतुराई दाखवत फायदा घेण्यासाठी जिवंत नवऱ्याला कागदोपत्री मारला असल्याचं प्रकरण उजेडात आलं आहे. विशेष म्हणजे हे प्रकरण ज्यावेळी अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं, त्यावेळी त्यांनी उलट तपासणी करण्याचं ठरवलं. तपासणी करीत असताना त्यांचे नवरे जिवंत असल्याचे आढळून आले. १२ महिलांनी खोटी कागदपत्रे दिल्याचे उजेडात आले आहे. १२ महिलांनी सरकारचं लाखो रुपयांचं नुकसान केलं आहे. त्या महिलांच्या (trending news) विरोधात अधिकाऱ्यांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. अधिकारी (cross inquiry) या प्रकरणाची कसून चौकशी करीत आहेत.

हा प्रकार झारखंड राज्यातील सिमडेगा जिल्ह्यातील ठेठईटांग प्रखंड या भागातील असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तिथल्या १२ महिलांनी विधवा असल्याचं सांगून सरकारची फसवणूक केली आहे. ज्यावेळी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल झाली, त्यावेळी त्यांनी उलट तपासणी केली. विशेष म्हणजे विधवा पेन्शन मिळण्यासाठी त्यांनी हा प्रकार केला आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सावित्री देवी यांनी 9,000 रुपये, रीता देवी यांनी 10,000 रुपये, फूलवती देवी यांनी 8,000 रुपये, शनियारों देवी यांनी 8,000 रुपये, कष्टी देवी यांनी 8,000 रुपये, गुड्डी देवी यांनी 8,000 रुपए, ललिता देवी यांनी 8,000 रुपये, शहरी देवी यांनी 8000 रुपये, मैनी देवी यांनी 8,000 रुपये, तारा देवी यांनी 8,000 रुपये, पुनिया देवी यांनी 8,000 रुपये आणि गुड़िया देवी यांनी पेन्शनच्या नावाखाली 13,000 रुपये घेतले आहेत. या सगळ्या महिलांचे पती अजून जिवंत आहेत.

हे सुद्धा वाचा

प्रखंड विकास पदाधिकारी यांनी सांगितलं की, त्या महिलांना गावातील सरपंचांनी कसल्याची प्रकारचं पत्र दिलेलं नाही. त्या महिलांनी ही कागदपत्र कुठून आणली आणि त्यांना ही आयडिया कुणी दिली याची चौकशी सुरु आहे.

इतक्या पैशाला फसवलं

पती जिवंत असताना सुध्दा विधवा पेन्शन मिळण्यासाठी महिलांनी आपल्या पतीला मारलं. झारखंड राज्यातील सिमडेगा जिल्ह्यातील हा प्रकार आहे. साधारण १२ महिलांनी एक लाख चार हजार रुपयांना फसवलं आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.