Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aditya L-1 Surya Mission | आदित्य एल-1 ने यशस्वीपणे पृथ्वीला मारली पहिली फेरी, इस्रोने दिली माहिती

भारताची पहिली सुर्य मोहिमेंतर्गत आदित्य एल-1 यानाला श्रीहरिकोटा येथून शनिवारी सकाळी पीएसएलव्ही रॉकेटद्वारे लॉंच करण्यात आले. हे यान 15 लाख किमीचा प्रवास येत्या चार महिन्यात करणार आहे. इस्रोने आज त्याच्या सद्यस्थितीची माहिती दिली.

Aditya L-1 Surya Mission | आदित्य एल-1 ने यशस्वीपणे पृथ्वीला मारली पहिली फेरी, इस्रोने दिली माहिती
aditya L-1Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Sep 03, 2023 | 4:45 PM

नवी दिल्ली | 3 सप्टेंबर 2023 : चंद्रयान-3 च्या अद्भूत यशानंतर भारताचे पहिले सौर मिशन आदित्य एल-1 ( Aditya L-1 ) काल शनिवारी सु्र्याच्या दिशेने निघाले आहे. इस्रोने रविवारी आदित्य एल-1 च्या सद्यस्थितीबद्दल माहिती जारी केली आहे. आदित्य एल-1 योग्य दिशेने प्रगतीकरीत असून त्याने रविवारी सकाळी पहिला अर्थ बाऊंड मॅन्युव्हर पूर्ण केल्याचे सांगितले. आदित्यने पहिली कक्षा बदलली आहे, आता ते पृथ्वीपासून नव्या कक्षेत प्रवेशिले असून त्याचे किमान आणि कमाल अंतर 245 बाय 22459 किमी आहे. आता पुढील मॅन्युव्हर 5 सप्टेंबर रोजी आहे. भारतीय वेळेनूसार रात्री 03:00 वाजता आहे.

भारताची पहिली सुर्य मोहिमेंतर्गत आदित्य एल-1 यानाला श्रीहरिकोटा येथून शनिवारी सकाळी पीएसएलव्ही रॉकेटद्वारे लॉंच करण्यात आले. इस्रोने म्हटले की आदित्य एल-1 ही सुर्याचा अभ्यास करणारी पहिली अंतराळातील वेधशाळा आहे. सुमारे 125 दिवसात म्हणजे साधारण चार महिन्यात ते पृथ्वीपासून 15 लाख किमीचे अंतर कापून पृथ्वी आणि सुर्यामधील एल-1 लॅंग्रेज पॉईंटवर पोहचणार आहे.

16 दिवसांत पृथ्वीला पाच फेऱ्या

आदित्य एल-1 ला तब्बल 125 दिवस एल-1 पॉईंटवर पोहचायला लागणार आहेत. आदित्य एल-1 आधी 16 दिवस पृथ्वीची प्रदक्षिणा करणार आहे. त्यानंतर आदित्य सुर्याच्या दिशेने त्याच्या मार्गाने रवाना होईल. या 16 दिवसात आदित्य पाच वेळा पृथ्वीच्या प्रदक्षिणा घालणार आहे. आता पुढील कक्षेतील बदल 5 सप्टेंबर रोजी होणार आहे. भारतीय वेळेप्रमाणे हे पुढील मॅन्युव्हर रात्री उशीरा 3.00 वाजता बंगळुरु येथील कमांड सेंटरमधून होईल.

इस्रोने केलेले ट्वीट येथे पाहा –

15 लाख किमीचे अंतर

पीएसएलव्ही या इस्रोच्या भरवशाच्या रॉकेटमधून आदित्य एल-1 ला पृथ्वीच्या आतील कक्षेत स्थापित केले होते. आज त्याच्या थ्रस्टरमध्ये एक्सटर्नल फोर्स देऊन आदित्य एल-1ची कक्षा बदलली आहे. आदित्य 15 लाख किमीचे अंतर गाठणार आहे. आदित्यला त्यासाठी 128 दिवस लागू शकतात.

सुर्याचा अभ्यास करणार

आदित्य एल-1 सुर्याचा कणांचा, सौर वादळांचा, सुर्याच्या कोरोनाचा तसेच अतिनील किरणांचा अभ्यास करणार आहे. सुर्याचा अभ्यास करण्यासाठी हे यान पाच वर्षे दोन महिने राहणार आहे. यासाठी 378 कोटी रुपयांचा खर्च या मिशनवर झाला आहे. आतापर्यंत अमेरिका, जर्मनी आणि युरोपीयन स्पेल एजन्सीने सुर्याचा अभ्यास करण्यासाठी यानं पाठविली आहे. आतापर्यंत 22 सुर्य मोहीमा पार पडल्या आहे. त्याची सर्वाधिक 14 मोहिमा नासाच्या आहेत. साल 1994 मध्ये युरोपीयन स्पेस एजन्सीने त्यांचे पहिले सु्र्य मिशन पाठविले होते. भारताचे हे पहिले सुर्य मिशन आहे.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.