PFI संघटनेच्या WhatsApp ग्रुपचा एडमिन पाकिस्तानी; तपासात अत्यंत धक्कादायक खुलासे
PFI संघटनेच्या WhatsApp ग्रुपचा एडमिन पाकिस्तानी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नवी दिल्ली : नवी दिल्ली : देशभरातील विविध राज्यांत पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेच्या कार्यालयांवर ईडी आणि एनआयएने मागील महिन्या भरापासून धाडसत्र राबवले आहे. या कारवाईच्या माध्यमातून मोदी सरकारने पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेच्या विरोधात थेट सर्जिकल स्ट्राईक केलेच आहे. दहशतवादविरोधी पथक अर्थात ATS चे अधिकारी याचा कसून तपास करत आहेत. PFI संघटनेच्या WhatsApp ग्रुपचा एडमिन पाकिस्तानी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीएफआय आणि त्याच्याशी संलग्न संघटनांवर पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे.
तपासादरम्यान ATS ने अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहे. PFI संघटनेशी निगडीत सदस्यांनी अनेक WhatsApp ग्रुप तयार केले होते. यापैकी एका WhatsApp ग्रुपचा एडमिन हा पाकिस्तानी असल्याची माहिती ATS च्या हाती लागली आहे.
हा पाकिस्तानी ज्या WhatsApp ग्रुपचा एडमिन होता त्या ग्रुपमध्ये आणखी 175 सदस्य होते. त्यापैकी बरेच जण अफगाणिस्तान आणि यूएईचे आहेत. हे सदस्य बंदी घातलेल्या सिमी या संघटनेप्रमाणेच काम करत होते अशी देखील माहिती समोर आली आहे.
यामुळे या सदस्यांनी भारताबाहेर प्रवास करुन अनेक आर्थिक व्यवहार केल्याचा संशय आहे. त्यानुसार तपाल सुरु आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एनआयए), महाराष्ट्र एटीएस आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) हे PFI संघटनेविरोधात देशव्यापी कारवाई करत आहेत.
ईडी आणि एनआयएने देशातील केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक आणि आसामसह 11 राज्यांत छापे टाकले. कारवाईअंतर्गत 106 संशयित ताब्यात घेतले. यासाठी 10 राज्यांच्या पोलिसांची मदत देखील घेण्यात आली होती.
महाराष्ट्र एटीएसने केली होती अनेक जणांना अटक
महाराष्ट्र एटीएसने मालेगाव, कोल्हापूर, बीड आणि पुणे येथून पाच जणांना अटक केली होती. त्यांचे मोबाईल फोन, कॉम्प्युटरती हार्ड डिस्क, लॅपटॉप आणि त्यांचे बँक डिटेल्स यासह अनेक कागदपत्र जप्त करण्यात आली होती. यांच्या बँक खात्यांमध्ये संशयास्पद व्यवहार आढळले आहेत.