पंतप्रधान मोदींवर 33 वर्षांनंतर कोसळला दु:खाचा डोंगर, 1989 मध्येही अनुभवला असाच वेदनादायी क्षण, त्यावेळी काय झालं होतं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिरा बा यांचं निधन झाले आहे, नरेंद्र मोदी यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. असेच दु:ख नरेंद्र मोदी यांच्या वाट्याला 33 वर्षांपूर्वीही आले होते.
गुजरात : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिरा बा यांच्या निधनाने संपूर्ण मोदी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिरा बा यांच्यात अधिकची जवळीक होती. हिरा बा यांच्या निधनाने नरेंद्र मोदी यांना मोठा धक्का बसला आहे. वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. नरेंद्र मोदी यांच्यावर इतकं मोठं दु:ख 33 वर्षानंतर आल्याचे बोलले जात आहे. 1989 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असाच वेदनादायी क्षण वाट्याला आला होता. यामध्ये नरेंद्र मोदी यांचे वडील दामोदरदास मोदी यांचे निधन झाले होते. त्यावेळीही संपूर्ण मोदी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. त्यामुळे तब्बल 33 वर्षानंतर सर्वाधिक मोठं दु:ख नरेंद्र मोदी यांच्या वाट्याला आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या वाडिलांबद्दल आईच्या वाढदिवशी एक ब्लॉग लिहिला होता त्यामध्ये वडिलांचा उल्लेख केला होता. त्यात वडिलांनी केलेल्या मेहनतीचा उल्लेख केला होता. त्यात मित्रत्व निभावल्याचा किस्साही सांगितला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिरा बा यांचे पहाटे वृद्धपकाळाने निधन झाले आहे, आईच्या निधनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
असेच दु:ख नरेंद्र मोदी यांना 33 वर्षी वाट्याला आले होते. यामध्ये नरेंद्र मोदी यांचे वडील दामोदरदास मोदी यांचे निधन झाले होते. त्यावेळी देखील नरेंद्र मोदी यांच्यासह संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता.
नरेंद्र मोदी यांनी आईच्या जन्मदिनाला लिहिलेल्या ब्लॉगमध्ये त्यांनी वाडिलांबद्दल दोन आठवणी सांगितल्या होत्या, त्यामध्ये नरेंद्र मोदी आपण स्वतः चहा विक्री करण्यास मदत केल्याचे सांगितले होते.
नरेंद्र मोदी यांनी ब्लॉगमध्ये म्हंटलं होतं वडनगर येथील रेल्वेस्टेशन येथे वडील दामोदरदास यांची चहा टपरी होती, रेल्वेस्टेशन आणि रेल्वेत चहा विक्रीचे काम करत होते.
शाळा सुटल्यानंतर वडिलांना चहा विक्रीच्या कामात मदत करत होतो, याशिवाय त्यांच्या एका मित्राचे निधन झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या अब्बास या मुलाला आधार दिला होता.
नरेंद्र मोदी यांना नुकताच मातृशोक झाला आहे. 33 वर्षांपूर्वी त्यांना पितृशोक झाला होता, त्यामुळे तब्बल 33 वर्षानंतर नरेंद्र मोदी यांच्यावर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे.