साडेपाच महिन्यांनंतर देशातील अ‍ॅक्टिव्ह कोरोनाग्रस्तांची संख्या 3 लाखांच्या खाली, रिकव्हरी रेट 95 टक्के

वर्ल्डोमीटर या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत जगभरात 7 कोटी 78 लाख 16 हजार 303 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

साडेपाच महिन्यांनंतर देशातील अ‍ॅक्टिव्ह कोरोनाग्रस्तांची संख्या 3 लाखांच्या खाली, रिकव्हरी रेट 95 टक्के
Follow us
| Updated on: Dec 22, 2020 | 5:20 PM

नवी दिल्ली : देशातील कोरोनाग्रस्तांची (Corona Patients) संख्या कमी होऊ लागली आहे. तर दुसऱ्या बाजूला ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूची नवी प्रजाती (Corona virus New Strain) सापडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेदरम्यान आरोग्य सचिव राजेश भूषण (Rajesh Bhushan) म्हणाले की, “जवळपास साडेपाच महिन्यांनंतर देशातील सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची (Active Corona Patients) संख्या तीन लाखांच्या खाली गेली आहे. सध्या देशातील एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येपैकी तीन टक्क्यांहून कमी अॅक्टिव्ह रुग्ण आहेत”. (after Five and a half months less than three lakh active corona cases in india)

राजेश भूषण म्हणाले की, गेल्या 7 आठवड्यांमध्ये नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. सरासरीपेक्षा कमी रुग्णांची नोंद होत आहे. गेल्या 24 तासात देशात आढळलेल्या एकून कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी 57 टक्के रुग्ण मध्य प्रदेश, तामिळनाडू, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि केरळमधील आहेत. तर गेल्या 24 तासात देशात जितक्या कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी 61 टक्के मृत्यू उत्तर प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, केरळ, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात नोंदवण्यात आले आहेत.

वर्ल्डोमीटर या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत जगभरात 7 कोटी 78 लाख 16 हजार 303 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 5 कोटी 47 लाख 5 हजार 247 रुग्ण बरे झाले आहेत, तर 17 लाख 11 हजार 475 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जगभरात सध्या 2 कोटी 13 लाख 99 हजार 581 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

आतापर्यंत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण अमेरिकेत आढळले आहेत. अमेरीकेत 1 कोटी 84 लाख 73 हजार 535 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 1 कोटी 8 लाख 2 हजार 882 रुग्ण बरे झाले आहेत, तर 3 लाख 26 हजार 772 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक कोरोनाबाधितांच्या बाबतीत भारत दुसऱ्या नंबरवर आहे. भारतात आतापर्यंत 1कोटी 75 हजार 529 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 96 लाख 36 हजार 687 रुग्ण बरे झाले आहेत, तर 1 लाख 46 हजार 145 बाधितांचा मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाबाधितांबाबतची ही आकडेवारी आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळलेले टॉप 10 देश

अमेरिका : एकूण कोरोनाबाधित – 18,473,716, मृत्यू – 326,772 भारत : एकूण कोरोनाबाधित – 10,075,422, मृत्यू – 146,145 ब्रझील : एकूण कोरोनाबाधित – 7,264,221, मृत्यू – 187,322 रशिया : एकूण कोरोनाबाधित – 2,906,503, मृत्यू – 51,912 फ्रान्स : एकूण कोरोनाबाधित – 2,479,151, मृत्यू – 60,900 यूके : एकूण कोरोनाबाधित – 2,073,511, मृत्यू – 67,616 तुर्की : एकूण कोरोनाबाधित – 2,043,704, मृत्यू – 18,351 इटली : एकूण कोरोनाबाधित – 1,964,054 , मृत्यू – 69,214 स्पेन : एकूण कोरोनाबाधित – 1,830,110, मृत्यू – 49,260 अर्जेंटिना : एकूण कोरोनाबाधित – 1,547,138, मृत्यू – 41,997

संबंधित  बातम्या

कोरोना विषाणूत 17 वेळा बदल, नव्या स्ट्रेनविषयी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं नागरिकांना काय सांगितलं?

भारतात 69 टक्के लोक म्हणतात, लसीकरणाची गरज नाही!, जाणून घ्या काय आहे कारण?

आनंदाची बातमी! पुढच्या आठवड्यात कोरोना लशीची पहिली खेप भारतात येणार

(after Five and a half months less than three lakh active corona cases in india)

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.