लोकसभा निवडणूकीआधी भाजपला दुसरा धक्का, गौतम गंभीरनंतर आणखी एका विद्यमान खासदाराची निवडणूकीतून माघार

आगामी लोकसभा निवणडूकीआधीच भाजपला धक्क्यावर धक्के बसताना दिसत आहेत. भाजपने 400 पार चा नार दिला आहे तर दुसरीकडे त्यांचेच विद्यमान खासदार आगामी निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर करत आहेत. गौतम गंभीरनंतर आणखी एका खासदाराने याबाबत घोषणा केली आहे.

लोकसभा निवडणूकीआधी भाजपला दुसरा धक्का, गौतम गंभीरनंतर आणखी एका विद्यमान खासदाराची निवडणूकीतून माघार
Follow us
| Updated on: Mar 02, 2024 | 5:45 PM

मुंबई : आगामी लोकसभा निवडणूकीआधी भाजपचे विद्यमान खासदार मोठे निर्णय घेताना दिसत आहे. टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि भाजप खासदार गौतम गंभीर यानेही राजकारणामध्ये आपण थांबत असल्याचा निर्णय घेतला आहे. गौतम गंभीर आता राजकारणात दिसणार नाही, त्याच्या या निर्णयाची सर्वत्र चर्चा होत असलेली पाहायला मिळत आहे. गंभीरचा निर्णय झाल्यावर भाजपच्या आणखी एका खासदाराने अशाच प्रकारचा निर्णय घेतला आहे. कोण आहे ते खासदार? त्यांनी असा निर्णय का घेण्यामागचं कारणही सांगितलं आहे.

कोण आहेत ते खासदार?

भाजप खासदार जयंत सिन्हा यांनी आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये न लढण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. हजारीबागचे खासदार असलेल्या जयंत सिन्हा यांनी फक्त खासदारकीसाठी निवडणुक लढवणार नसल्याचं सांगितलं आहे. परंतु ते भाजपसोबत काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. गंभीरपाठोपाठ सिन्हा यांनीसुद्धा अशा प्रकारचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

मी पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांना माझ्या थेट निवडणुकीच्या कर्तव्यातून मुक्त करण्याची विनंती केली आहे. जेणेकरून मी भारत आणि जगभरातील जागतिक हवामान बदलांना तोंड देण्यासाठी माझे प्रयत्न केंद्रित करू शकेल. आर्थिक आणि प्रशासनाच्या मुद्द्यांवर मी पक्षासोबत काम करत राहील. गेल्या दहा वर्षात मला भारत आणि हजारीबागच्या जनतेची सेवा करण्याचे भाग्य लाभले आहे. याशिवाय मला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजप नेतृत्वाने अनेक संधी दिल्या आहेत. त्या सर्वांचे माझे मनःपूर्वक आभार. जय हिंद, असं सिन्हा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान,  भाजप आगमी लोकसभा निवडणूकीच्या आधी  उमेवारांची नावे जाहीर करण्याआधी खासदारांनी मोठे निर्णय घेतले आहेत. भाजप विद्यमान खासदारांचे तिकीट कापणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजली होती. मात्र त्याआधीच एक-एक खासदार स्वत: निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीरपणे सांगत आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.