दुर्घटनेमुळे व्यथित, दोषींना सोडणार नाही – हातरस दुर्घटनेनंतर भोले बाबा पहिल्यांदा समोर

हातरस दुर्घटनेनंतर ​​भोले बाबा पहिल्यांदाच समोर आले आहेत. बाबा सूरजपाल यांनी या घटनेनंतर दुःख व्यक्त करत या दुर्घटेनासाठी दोषी असलेल्यांना सोडणार नाही, असे ठणकावू सांगितलं. हातरस येथे सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी होऊन 121 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले.

दुर्घटनेमुळे व्यथित, दोषींना सोडणार नाही - हातरस दुर्घटनेनंतर भोले बाबा पहिल्यांदा समोर
Follow us
| Updated on: Jul 06, 2024 | 9:13 AM

हातरस दुर्घटनेमध्ये 121 जणांच्या मृत्यूनंतर फरार असलेले सूरज पाल ऊर्फ भोले बाबा ऊर्फ नारायण साकार विश्व हरी यांनी पहिल्यांदाच मीडियासमोर येऊन वक्तव्य केले आहे. 2 जुलैच्या घटनेनंतर आपण खूप व्यथित झालो आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. ‘या दु:खाच्या प्रसंगातून सावरण्याचे बळ ईश्वर आपल्याला देवो. सर्व सरकारी प्रशासनावर विश्वास ठेवा ‘ असे आवाहन त्यांनी केले. अराजकता पसरवणाऱ्यांना सोडणार नाही. मी माझे वकील एपी सिंग यांच्यामार्फत समितीच्या सदस्यांना विनंती केली आहे की त्यांनी शोकग्रस्त कुटुंबियांच्या आणि जखमींच्या पाठीशी उभे राहून त्यांना आयुष्यभर मदत करावी, त्यांनी नमूद केले. मंगळवारी भोले बाबांच्या सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीत 121 जणांचा मृत्यू झाला होता.

दुर्घटनेच्या 4 दिवसांनंतर समोर आले भोले बाबा

हातरस दुर्घटना ज्या दिवशी झाली, तेव्हापासूनच बाबा सूरजपाल बेपत्ता होते. या दुर्दैवी घटनेच्या चार दिवसांनंतर प्रथमच ते समोर आले आहेहत. मात्र त्यापूर्वी, दुर्दैवी घटनेनंतर सुमारे 30 तासांनंतर, बाबांचे एक लेखी निवेदन समोर आले होते. त्यामध्ये त्यांनी मृतांबद्दल शोक व्यक्त केला आणि जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. गुरुवारी त्यांनी जाहीर केलेल्या लेखी संदेशात बाबा सूरजपाल यांनी असा दावा केला की , काही अनियंत्रित घटकांनी ही चेंगराचेंगरी घडवली, त्यामुळेच एवढी मोठी दुर्घटना घडली.

हातरसमधील या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण देश हादरला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. बाबा सूरजपाल यांच्या वतीने ज्येष्ठ वकील एपी सिंग यांची नियुक्ती करण्यात आली. हे तेच एपी सिंह आहेत, ज्यांनी निर्भया प्रकरणातील आरोपी, सीमा हैदर आणि 2020 हातरस प्रकरणातील आरोपींचा खटला लढवला होता. दुसरीकडे, या दुर्दैवी घटनेतील मुख्य आरोपी देव प्रकाश मधुकर याला अटक करण्यात आली आहे.

कोट्यवधींचे साम्राज्य, अनेक राज्यात आहेत बाबांचे अनुयायी

नारायण साकार हरी उर्फ ​​भोले बाबा यांचे कोट्यवधींचे साम्राज्य आहे. बाबा सूरजपाल यांचे अनेक राज्यांत आश्रम आहेत. सूरज पाल हे स्वतःला देवाचा सेवक म्हणवतात. तर त्यांचे भक्त त्यांना देवाचा अवतार मानतात. भोले बाबा हे जाटव समाजाचे आहेत. गरीब वर्गात त्यांचे भक्त जास्त आहेत. हातरस, एटा, आग्रा, मैनपुरी आणि शाहजहांपूर येथे त्यांचा बराच प्रभाव आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये त्यांचे अनेक अनुयायी आहेत. तसेच दिल्ली, हरियाणा आणि उत्तराखंडमध्येही त्यांचा प्रभाव आहे. प्रत्येक सत्संगात लाखोंची गर्दी असते. बाबांचे उत्तर प्रदेशात जवळपास 25 आश्रम आहेत.

दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?.
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले.