लाल बहादूर शास्त्रींनंतर थेट मोदीच ! 22 डिसेंबर ऐतिहासिक ठरणार !
अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवात सहभागी होण्याचं निमंत्रण नरेंद्र मोदींनी स्वीकारलं
नवी दिल्ली : अलिगढ मुस्लिम विद्यापीठासाठी (Aligarh Muslim University) 22 डिसेंबर ही तारीख ऐतिहासिक ठरणार आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवात सहभागी होणार आहेत. आश्चर्य म्हणजे लाल बहादूर शास्त्री (Lal Bahadur Shastri) यांच्यानंतर एकही पंतप्रधान अलिगढ विद्यापीठाच्या कोणत्याच कार्यक्रमात सहभागी झालेले नाहीत. 1964 मध्ये लाल बहादूर शास्त्री हे विद्यापीठाच्या पदवीदान समारंभास हजर राहिले होते. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होतील. अर्थातच कोव्हिडमुळे मोदी हे ऑनलाईन उद्घाटन करतील. इतर कार्यक्रमात सहभागी होतील. (After Lal Bahadur Shastri Narendra Modi to attend Aligarh Muslim University program)
नरेंद्र मोदींनी शताब्दी महोत्सवात सहभागी होण्याचं निमंत्रण स्वीकारलंय. त्यावर विद्यापीठाच्या कुलगुरूंनी आनंद व्यक्त केलाय. मोदींच्या सहभागामुळे विद्यापीठाच्या विकासाला मदत तर होईलच पण विद्यार्थ्यांना चांगल्या ठिकाणी नोकरी मिळण्यासही मदत होईल, असा विश्वास कुलगुरू तारिक मन्सूर यांनी व्यक्त केलाय. याच कार्यक्रमात केंद्रीय शिक्षण मंत्रीही सहभागी होणार होते. राष्ट्रपती कोविंद यांनाही निमंत्रित केलं गेलं होतं, पण आता ते पुढच्या वर्षीच्या कार्यक्रमात हजेरी लावतील.
मोदी काय काय करतील ?
मोदींच्या हस्ते विद्यापीठाच्या नव्या गेटचं उद्घाटन, पोस्टल तिकीटाचं अनावरण, कॉफी टेबल बूकचं विमोचन पार पडणार अशी माहिती विद्यापीठाने दिलीय. कोव्हिडमुळे शताब्दी महोत्सवाचे सर्व कार्यक्रम हे ऑनलाईन होणार आहेत. मोदींचा सहभागही ऑनलाईनच असेल.
PM Narendra Modi to attend Aligarh Muslim University’s centenary celebrations via video conference: AMU
— Press Trust of India (@PTI_News) December 16, 2020
अलिगढ विद्यापीठ भाजप नेत्यांच्या टार्गेटवर !
गेल्या कित्येक वर्षापासून अलिगढ मुस्लिम विद्यापीठ हे भाजप नेत्यांच्या टार्गेटवर राहिलेलं आहे. त्याचाच परिणाम म्हणून भाजप आणि विद्यापीठातले विद्यार्थी यांच्यात वाद होत आलेत. आताही विद्यापीठात शिकवणाऱ्या किंवा संबंधित विचारवंतांनी मोदी सरकारच्या निर्णयाविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिलाय. अलिगढ मुस्लिम विद्यापीठावरून अनेक वेळेस दोन्ही बाजूच्या नेत्यांनी राजकीय ध्रुवीकरणही करण्याचा प्रयत्न केलाय.
संबंधित बातम्या :
नागरिकत्व कायद्याला विरोध, अलिगढ विद्यापीठात चिघळलेली परिस्थिती नियंत्रणात
(After Lal Bahadur Shastri Narendra Modi to attend Aligarh Muslim University program)