मोबाइल बॅटरीच्या स्फोटाने विमान हादरलं, हवेतच रोखला गेला प्रवाशांचा श्वास; एअर इंडियाच्या फ्लाइटचे इमर्जन्सी लँडिंग

उदयपूरमध्ये एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. त्यावेळी फ्लाइटमधील बहुसंख्य प्रवासी घाबरलेले दिसत होते.

मोबाइल बॅटरीच्या स्फोटाने विमान हादरलं, हवेतच रोखला गेला प्रवाशांचा श्वास; एअर इंडियाच्या फ्लाइटचे इमर्जन्सी लँडिंग
Image Credit source: file photo
Follow us
| Updated on: Jul 17, 2023 | 5:19 PM

Flight Emergency Landing : राजस्थानच्या उदयपूरमध्ये (Udaipur) सोमवारी मोठी विमान दुर्घटना होता-होता टळली. तेथे एअर इंडियाच्या (Air India) विमानाचे इमर्जन्सी लँडिंग (Flight Emergency Landing) करावे लागले. प्राथमिक माहितीनुसार, विमान हवेत असताना एका प्रवाशाच्या मोबाईल फोनच्या बॅटरीमध्ये स्फोट झाल्यामुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. संपूर्ण तांत्रिक तपासणी करण्यात आल्यानंतर विमान दिल्लीच्या दिशेने रवाना झाले.

फ्लाईटने टेक ऑफ केल्यावर थोड्याच वेळात मोठ्ठा आवाज आल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर उदयपूरच्या डबोक एअरपोर्टवर इमर्जन्सी लँडिंगदरम्यान काही प्रवाशांना विमानातून खाली उतरवण्यात आसे. त्यानंतर विमानाची संपूर्ण तपासणी करण्यात आली. सर्व काही आलबेल असल्याचे समजल्यानंतरच फ्लाइट दिल्लीच्या दिशेने रवाना झाली.

फ्लाइटमध्ये होते 140 प्रवासी

एअर इंडियाची फ्लाइट क्रमांक -470 मध्ये हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या फ्लाइटमध्ये एकूण 140 प्रवासी होते. या विमानाने उदयपूरहून दिल्लीच्या दिशेने दुपारी एक वाजता उड्डाण केले. मात्र टेक ऑफ नंतर काही वेळातच एका प्रवाशाच्या मोबाईल फोनची बॅटरी फुटली. फोनच्या बॅटरीचा स्फोट इतका जबरदस्त होता की फ्लाइटमधील सर्वच प्रवासी हादरले. त्यानंतर विमानातील क्रू मेंबर्सनी प्रवाशांची समजूत काढली व विमान तातडीने लँड करण्यात आले.

मोठा अपघात टळला

याआधीही अनेकदा विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. मात्र विमान हवेत असतानाच प्रवाशाच्या मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाल्यामुळे इमर्जन्सी लँडिंग करण्याची ही पहिलीच वेळ आहे. बॅटरीचा स्फोट झाल्यामुळे फ्लाइटच्या आत आग लागू शकली असती. मात्र सुदैवाने कोणीतीही मोठी दुर्घटना घडली नाही.

गेल्या महिन्यात दिल्लीत झाले होते इमर्जन्सी लँडिंग

दरम्यान गेल्याच महिन्यात इंडिगो विमानाचे दिल्लीतील IGI विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. इंडिगोचे विमान दिल्लीहून डेहराडूनला जात असताना इंजिनमध्ये बिघाड झाला. यामुळे टेक ऑफ नंतर अवघ्या काही वेळातच विमानाने इमर्जन्सी लँडिंग केले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.