Onion Price Hike : टोमॅटोचा अध्याय झाला, आता सर्वसामान्यांना रडवणार कांदा

Onion Price Hike : टोमॅटोनंतर आता कांदा सर्वसामान्यांना रडविण्याच्या तयारीत आहे. कांदाचा वांदा ग्राहकांसाठी नवीन नाही. दरवर्षी कांद्यावरुन महाभारत होतेच. यंदा टोमॅटोचा दरवाढीचा अध्याय सुरु असताना आता कांद्याचे भाव भडकण्याची शक्यता आहे.

Onion Price Hike : टोमॅटोचा अध्याय झाला, आता सर्वसामान्यांना रडवणार कांदा
Follow us
| Updated on: Jun 30, 2023 | 6:11 PM

नवी दिल्ली : देशात कांद्याच्या दरवाढीची चर्चा यापूर्वी कित्येकदा झाली आहे. राज्य सरकारच नाही तर केंद्र सरकार पण कांद्याच्या वांद्यावरुन चिंतेत पडलेलं आहे. कांद्याची दहशत अनेक राज्य सरकारांना माहिती आहे. पण सध्या देशात टोमॅटोने (Tomato Price) ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. आता आणखी कांद्याची त्यात भर पडणार आहे. कांदा सर्वसामान्यांचा खिसा खाली करु शकतो. कांद्याच्या किंमतीत (Onion Price) वाढ होण्याची शक्यता आहे. टोमॅटोनंतर आता कांदा सर्वसामान्यांना रडविण्याच्या तयारीत आहे. सुरुवातीला 80 रुपये किलो दराने टोमॅटो विक्री झाले. देशातील काही भागात टोमॅटोचा दर 100-120 रुपये प्रति किलोवर पोहचला. आता कांद्याचा क्रमांक आहे. काय आहे यामागील कारणे..

व्यापाऱ्यांचे म्हणणे काय मीडिया रिपोर्टनुसार, देशातील अनेक शहरात कांद्याच्या किंमती वाढू शकता. काही व्यापारी त्यासाठी लांबणीवर पडलेल्या पावसाळ्याला दोष देत आहे. त्यांच्या मते, ऋतू चक्र प्रभावित झाल्यास दिवाळीच्या मागेपुढे किंमती भडकण्याची दाट शक्यता आहे.

आकडे काय सांगतात केंद्र सरकारने कांदा उत्पादनाचे आकडे समोर आणले आहे. त्यानुसार, महाराष्ट्रातील पाच क्षेत्रात गेल्या महिन्यात कांद्याच्या किरकोळ किंमतीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या किंमती कमी आहेत. सरकारी डेटानुसार, भारतात वर्ष 2020 मध्ये कांद्याच्या सरासरी किंमती 35.88 रुपये, 2021 मध्ये कांद्याच्या सरासरी किंमती 32.52 रुपये आणि 2022 मध्ये 28 रुपये प्रति किलो होत्या. 2023 मध्ये आतापर्यंत या किंमती स्थिर आहेत. पण येत्या काही महिन्यात या किंमती वाढू शकता.

हे सुद्धा वाचा

सरकारचा दावा काय केंद्र सरकारने दोन महिन्यांअगोदर शेतकऱ्यांकडून जवळपास 0.14 दशलक्ष टन कांदा खरेदी केला. केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी एप्रिल महिन्यात याविषयी घोषणा केली होती. त्यानुसार, केंद्र सरकार 2023-24 या काळात 3 लाख टन कांद्याचा बफर साठा करणार होते. गेल्या वर्षी 2022-23 मध्ये 2.51 लाख टन कांदा बफर स्टॉकमध्ये होता.

उत्पादन घसरले भारत सरकारच्या आकडेवारीनुसार, या महिन्याच्या सुरुवातीला कांद्याचे उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. 2021-22 मध्ये कांदा उत्पादन 31.69 दशलक्ष टनावरुन घसरुन 31.01 दशलक्ष टनावर येण्याचा अंदाज आहे.

बफर स्टॉक कशासाठी बफर स्टॉक अडचणीच्या काळासाठी तयार करण्यात येतो. यामुळे बाजारात किंमती स्थिर ठेवता येतात. अडचणीच्या काळात हा बफर स्टॉक खुला करण्यात येतो. त्यामुळे किंमती वाढत नाहीत. बाजारात व्यापारी काळाबाजार करत असतील तर त्यांच्यावर अंकुश ठेवता येतो. रब्बी हंगामातील कांदा एप्रिल महिन्यात हाती येतो. तर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खरीप पीकाची कापणी होते.

टोमॅटोची दरवाढ टोमॅटोचे भाव एकदम गगनाला भिडले. सुरुवातीला 80 रुपये किलो दराने टोमॅटो विक्री झाले. देशातील काही भागात टोमॅटोचा दर 100-120 रुपये प्रति किलोवर पोहचला. काही दिवसांपूर्वी देशात टोमॅटोच्या किंमती 10 ते 20 रुपये किलो होत्या. देशभरात पावसाने खेळ बिघडवल्याने इतर भाजीपाला मागण्याची शक्यता आहे.

लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.