Agneepath Scheme : अग्निपथ योजनेवरून गोंधळ सुरू; बिहारमध्ये लोक उतरले रस्त्यावर, मुझफ्फरपूरमध्ये रेल्वेरही दगडफेक
अग्निपथ योजनेचा विरोध करणाऱ्या तरूणांचे म्हण आहे की, आमदारांनाही पाच वर्षांचा कालावधी मिळतो मग आम्हाला चार वर्षांचाच का? नक्की चार वर्षात असं काय होणार आहे. चार वर्षानंतर आम्ही रस्त्यावर येऊ. तसेच या योजनेलाच रद्द करावे अशी मागणी तरूणांनी केली.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने (Central Government) लष्करात शॉर्ट कमिशनसाठी जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेवरून (Agneepath Yojana) बिहारमध्ये मंगळवारी गदारोळ झाला. योजनेला विरोध करत बक्सरमध्ये तरुणांनी रेल्वेवर दगडफेक (Stone Throwing) केली. तर मुझफ्फरपूरमध्ये रस्त्यावर गोंधळ सुरू घातला जात आहे. तर मुझफ्फरपूरमधील माडीपूरमध्ये टायर पेटवून चक्काजाम करण्यात आला आहे. याचबरोबर आरामध्येही गोंधळाचे वातावरण तयार झाले आहे. त्याचबरोबर आंदोलकांकडून अलेक ठिकाणी चक्काजाम करण्यात आला आहे. तर बंदोबस्तावर तैणात पोलिसांकडून आंदोलकांची समजूत काढण्यात येत असून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. याचदरम्यान आज बुधवारी बक्सरमध्ये मोठ्या संख्येने तरूण एकत्र आले. त्यांनी आपला मोर्चा रेल्वेस्टेशनकडे वळवला आणि रेल्वेट्रॅक वर गोंधळ घातला. येथे तरूणांनी घोषणा दिल्या आणि रेल्वेट्रॅकवर धरना दिला. त्यामुळे जन शताब्दी एक्सप्रेस सुमारे एक तास थांबून होती. तर काही तरूणांनी तेथून जाणाऱ्या पठना पाटलिपुत्र एक्सप्रेसवर दगडफेक केली. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी बळाचा वापर करत रेल्वेट्रॅक मोकळा केला.
मुझफ्फरपूर चक्का जाम
मुझफ्फरपूरमध्ये बुधवारी सेनेत भर्ती होणाऱ्यांनी उग्र निदर्शने केली. येथे शेकडो तरूणांनी एकत्र येत चक्काजाम केला. त्यांनी हातात लाठ्या काठ्या घेऊन निदर्शने केली. माजीपूरमधील आगजनी रोड जाम केला. त्यावेळी पोलिसांनी निदर्शने करणाऱ्या तरूणांची समजूत काढली मात्र तरूणांनी हे सगळ जोपर्यंत एक अधिकारी सांगत नाही तोपर्यंत आम्ही बाजूला होणार नाही असे म्हटलं आहे. यानंतर पोलिसांकडून लाठीचार्ज केला. तर निदर्शने करणाऱ्या तरूणांना पळवून पळवून मारले. तर लाठीचार्जनंतर एकच गोंधळ उडाला.
चार वर्षांसाठी नोकरीवरून विरोध
अग्निपथ योजनेचा विरोध करणाऱ्या तरूणांचे म्हण आहे की, आमदारांनाही पाच वर्षांचा कालावधी मिळतो मग आम्हाला चार वर्षांचाच का? नक्की चार वर्षात असं काय होणार आहे. चार वर्षानंतर आम्ही रस्त्यावर येऊ. तसेच या योजनेलाच रद्द करावे अशी मागणी तरूणांनी केली.
45 हजार अग्निवीरांची भरती
‘अग्निपथ भरती योजने’अंतर्गत तरुणांना चार वर्षांच्या कालावधीसाठी सैन्यात भरती होण्याची संधी मिळणार आहे. 17 ते 21 वर्षे वयोगटातील तरुण मुले व मुली यासाठी पात्र असतील. यासाठी दहावी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी अर्ज करू शकतात. ते 90 दिवसांत सुरू होईल. यंदा 45 हजार अग्निवीरांची भरती होणार आहे. पहिल्या भरती प्रक्रियेत युवकांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी देखील चार वर्षांमध्ये समाविष्ट केला जाईल.
प्रत्येक अग्निवीरला भरतीच्या वर्षात 30 हजार महिन्यांचा पगार मिळेल. यातील 70 टक्के म्हणजेच 21 हजार रुपये त्यांना देण्यात येणार आहेत. उर्वरित 30 टक्के म्हणजेच 9 हजार रुपये अग्निवीर कॉर्प्स फंडमध्ये जमा केले जातील. सरकारही तेवढीच रक्कम या निधीत टाकणार आहे. अग्निवीरचा पगार दुसऱ्या वर्षी 33 हजार, तिसऱ्या वर्षी 36.5 हजार आणि चौथ्या वर्षी 40 हजार रुपये पगार म्हणून देण्यात येण्यात येणार आहे.