बिहार : अग्निपथवरून (AGNIPATH) सध्या देशभरात जोरदार राडा सुरूच आहे. अनेक राज्यातली तरुणाई या योजनेला विरोध करत रस्त्यावर उतरली आहे. बिहारमधील (Bihar Protest) जाळपोळही सुरूच आहे. आज बिहारमध्ये लोकांनी पोलीस स्टेशनही सोडलं नाही. भडकलेल्या आंदोलकांनी पोलीस स्टेशन (Bihar Police) तर जाळलेच मात्र त्यांनी पोलीस स्टेशनबाहेरची वाहनंही सोडली नाहीत. पोलिसांच्या वाहनांचीही राख झाली आहे. बिहारमधील नालंदा येथील इस्लामपूर रेल्वे स्थानकावर अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ हुल्लडबाज विद्यार्थ्यांनी स्थानकावर उभ्या असलेल्या मगध एक्सप्रेसच्या 4 बोगी पेटवून दिल्या. यावेळी दगडफेकही करण्यात आली. स्थानकाभोवती मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अशीच परिस्थिती सध्या अनेक ठिकाणी आहे. विशेष म्हणजे आंदोलनं झालेली सर्वात जास्त राज्ये ही भाजपशासित आहेत. त्यामुळे या योजनेवरून दोन्ही बाजुने प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
#WATCH Jattari Police Station building and a police vehicle were set ablaze by protesters in Aligarh#AgnipathProtests pic.twitter.com/WFPI7CVQuE
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) June 17, 2022
बिहार विधानसभेत विरोधी पक्षनेते आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी ‘अग्निपथ’ योजनेवर निशाणा साधला आहे. 4 वर्षांच्या करारावर बहाल केलेल्या अग्निवीरांना नियमित सैनिकांप्रमाणे वर्षभरात 90 दिवसांची रजा मिळणार का? अग्निपथ योजना न्यायप्रविष्ट असेल तर त्यात कंत्राटी अधिकाऱ्यांची भरती का केली जात नाही, असा प्रश्न तेजस्वी यांनी उपस्थित केला. फक्त कंत्राटी सैनिकांचीच भरती का? ही मनरेगा सुशिक्षित तरुणांसाठी आहे का? असे अनेक सवाल त्यांनी केले आहेत. त्यामुळे आता यावरून राजकारण आणकी तापताना दिसतंय.
हिमाचल प्रदेशातील उना येथे अग्निपथ योजनेविरोधात माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या पक्षाच्या कार्यालयाबाहेर गदारोळ करण्यात आलाय. यावेळी तरुणांनी जोरदार घोषणाबाजी केली. मात्र, अनुराग ठाकूर यांनी ही क्रांतिकारी योजना असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रसेवा आणि अग्निवीरांना चांगला पैसा मिळाल्यानंतर इतर नोकऱ्यांचे मार्ग खुले होतील, असे ते म्हणाले. मात्र हे आंदोलन अजूनही शांत व्हायचं नाव घेत नाहीये.