नवी दिल्ली : केंद्राने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या 70 दिवसांपासून दिल्लीत (Narendra Singh Tomar Reply To Rahul Gandhi) शेतकरी आंदोलन करत आहेत. जोपर्यंत हे कायदे रद्द केले जात नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे शेतकऱ्यांना मोठं समर्थन देताना दिसत आहेत. राहुल गांधी यांनी बुधवारी एक ट्वीट करत विचारलं की, “जगातील जास्तकरुन हुकूमशहांची नाव M वरुन का सुरु होतात?”. यावर आता केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी उत्तर दिलं आहे (Narendra Singh Tomar Reply To Rahul Gandhi).
त्यांनी सांगितलं, ‘राहुल गांधी यांच्या वक्तव्याला काँग्रेसही गंभीरतेने घेत नाही. जर ‘एम’पासून सुरु केलं तर मोतीलाल नेहरु यांचंही नाव येतं. त्यामुळे त्यांना जरा बघून टिप्पणी करायला हवी’.
राहुल गांधीने ट्वीट करत विचारलं, ‘जगातील अनेक हुकूमशहांची नावं ‘M’ पासून का सुरु होतात? मार्कोस, मुसोलिनी, मिलोसेविच, मुबारक, मोबुतु, मुशर्रफ, माइकॉम्बेरो.’ राहुल गांधी यांचं हे ट्वीट व्हायरल झालं. त्यानंतर भाजपने यावर प्रतिउत्तर दिलं.
राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आरोप लावला की भारताच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का लागला आहे आणि भाजप आणि आरएसएसने देशाची ‘सॉफ्ट पावर’ला ध्वस्त केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांच्या सुरक्षेची आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. त्यासाठीच त्यांना निवडण्यात आलं आहे. (Narendra Singh Tomar Reply To Rahul Gandhi)
काँग्रेस नेते म्हणाले, ‘सर्वात पहिला प्रश्न म्हणजे सरकार किल्लेबंदी का करत आहे? ते शेतकऱ्यांना घाबरतात का? शेतकरी त्यांचे शत्रू आहेत का? शेतकरी देशाची ताकद आहेत. त्यांना मारणे, धमकावणे सरकारचं काम नाही. सरकारचं काम चर्चा करणे आहे आणि समस्येचं समाधान काढणं आहे. शेतकरी मागे हटणार नाही. अखेर सरकारला मागे पाऊल घ्यावे लागेल. यातच सर्वांचं भलं आहे की सरकारने मागे हटावं’.
गोळ्या झाडल्या जाव्यात, प्रेतांचे खच पडावेत हीच राहुल गांधींची इच्छा: संबित पात्राhttps://t.co/X1AZNJmft9#RahulGandhi #SambitPatra #BJP #Congress #FarmersProtest @sambitswaraj @BJP4Maharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 3, 2021
Narendra Singh Tomar Reply To Rahul Gandhi
संबंधित बातम्या :
मोठी बातमी: नाना पटोलेंनी घेतली राहुल गांधींची भेट; प्रदेशाध्यक्ष निवडीच्या हालचाली अंतिम टप्प्यात